For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे वेदनेपासून मिळतो दिलासा

06:43 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे वेदनेपासून मिळतो दिलासा
Advertisement

ब्रेन स्कॅनमधून झाला खुलासा

Advertisement

माइंडफुलनेस मेडिटेशन एक प्राचीन अभ्यास असून ज्यात वर्तमान क्षणात कुठलाही तणाव, विचार किंवा पूर्वग्रहाशिवाय ध्यान केंद्रीत केले जाते. याच्या सरावामुळे मेंदूच्या पेशींदरम्यान कम्युनिकेशन म्हणजेच संचाराचा खास मार्ग तयार होतो, यामुळे वेदना कमी जाणवते आणि मनाला शांती मिळत असल्याचे नव्या अध्ययनातून समोर आले आहे.

माइंडफुलनेस मेडिटेशनद्वारे मेंदूचे तंत्र खुले होते, ते प्लेसीबोच्या प्रभावापासून वेगळे आहे, हे प्लेसीबोच्या प्रभावापेक्षा अधिक शक्तिशाली असते. याच्या प्रभावामुळे व्यक्ती वर्तमानात जगतो, यामुळे मेंदूला शांती आणि स्थैर्य मिळते, यावर करण्यात आलेले अध्ययन अलिकडेच बायोलॉजिकल सायकेट्रीमध्ये प्रकाशित झाले आहे.

Advertisement

अनेकदा तंदुरुस्त लोक देखील कमी काळासाठी क्रोनिक वेदनेला सामोरे जातात. त्यांना या मेडिटेशन तंत्रज्ञानामुळे मदत मिळू शकते. ही एक उत्तम थेरपी असल्याचे अध्ययनात म्हटले गेले आहे. अध्ययन करणारे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे एनेस्थेसियोलॉजिस्ट फादेल जीदान यांनी कोट्यावधी लोक दरदिनी क्रोनिक वेदनेला तोंड देतात, परंतु या वेदनेपासून कशाप्रकारे दिलासा मिळवावा हे त्यांना माहिती नसते असे म्हटले आहे.

माइंडफुलनेस मेडिटेशन शतकांपासून होत आले आहे. अनेकदा वैज्ञानिकांनी यावर प्रश्नही उपस्थित केले आहे. परंतु माज्या अध्ययनात यामुळे माणसांना वेदनेपासून दिलासा मिळतो हे सिद्ध झाले आहे. वेदनेच्या लक्षणामध्ये आराम मिळतोय हे लोकांना वाटते. हे वाटू लागताच त्यांचे शरीर वेदनेपासून आराम मिळवू लागते. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू वेगळ्याप्रकारे काम करतो. परंतु या मेडिटेशन तंत्रज्ञानामुळे प्रत्येक व्यक्तीचा मेंदू वेदनेप्रकरणी एकसारखे काम करतो. आराम मिळण्याची तीव्रता कमी अधिक असू शकते, परंतु दिलासा मिळतोच क्रोनिक वेदनेपासून लवकर आराम मिळू लागतो असे फादेल यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.