महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मन उधाण वाऱ्याचे...

06:01 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लहान मुला-मुलींपासून त्यांच्या आई-वडीलांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकाच ठिकाणी लक्ष देऊन कोणतेही काम सलग एक-दोन तास लक्षपूर्वक करणे. आताच्या काळात कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी सर्वात कठीण कामगिरी कोणती? सलग दोन तास एकाच ठिकाणी बसून चित्र काढणे, एकच पुस्तक सलगपणे वाचणे, गायन-वादन-नृत्य-पढंत यापैकी एकावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून रियाज करणे. इतकेच नव्हे, तर एखादा गायन-वादनाचा कार्यक्रम पूर्णपणे लक्ष देऊन ऐकणे, घरबसल्या किंवा थिएटरमध्ये चित्रपट पूर्णपणे लक्ष देऊन बघणे, हे सुद्धा एक आव्हान आहे. याचे कारण आपल्या सर्वांचा attाहूग्दह sज्aह कमी झाला आहे.

Advertisement

युट्यूबवर एखादे व्याख्यान/मुलाखत असल्याचे आपल्याला दिसले तर आपण प्रथम तो व्हिडियो किती कालावधीचा आहे, हे बघतो. समजा तो व्हिडियो अर्ध्या तासाचा असेल तर शक्यतो बघण्याचे टाळतो किंवा पहिल्या पाच मिनिटानंतर बंद करतो आणि दुसऱ्या कामाला लागतो. याचा अर्थ दुसरे काम महत्त्वाचे असते असे नव्हे, तर दुसरा व्हिडियो कोणता आहे किंवा मोबाईलवर अन्य काही ‘बघण्यासारखे’ आहे का, याची चाचपणी करतो. त्यामुळे अलीकडे त्या यु ट्यूबवरील व्हिडियोचे चार-पाच मिनिटांचे भाग पडल्याचे आपल्याला दिसते. एकूणच आसपासची व्यवस्था तुम्ही कोणतीही एकच गोष्ट सलग एक-दोन तास बसून करू नये, यासाठी प्रयत्नशील असते.

Advertisement

कोणतेही व्याख्यान सलग एक तास ऐकण्याची लहान-मोठ्यांची तयारी नसते. त्यामुळे अलीकडे व्याख्याने दृक-श्राव्य असतात. दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक ‘स्लाईड’वर मजकूर कमीत कमी ठेवावा लागतो आणि त्यामध्ये एक चित्र दाखवावे लागते. ही अवस्था जर मोठ्या माणसांची असेल तर शालेय विद्यार्थ्यांची अवस्था कशी असेल याची कल्पना केलेली बरी.

भाषणाऐवजी संभाषण

पाचवी ते दहावीच्या वर्गामध्ये एका विषयाचा एक तास पंचेचाळीस मिनिटांचा असल्यास तो पूर्ण वेळ शिक्षक ‘व्याख्यान’ देत राहिले तर समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना तो विषय समजणार नाहीच शिवाय त्यांचे लक्षही त्या विषयावर राहणार नाही, हे नक्की. यासाठीच आताच्या शिक्षकांना कोणताही विषय प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या सहभागामधून संभाषणाद्वारे शिकवण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पाच-दहा मिनिटांनी एखादा लक्षवेधी प्रश्न विचारणे, कोणा विद्यार्थ्याला पुस्तकातील एखादे वाक्य वाचायला सांगणे, अशा काही क्लुप्त्या कराव्या लागतात. ‘इकडे लक्ष द्या’, ‘खिडकीबाहेर बघू नका’ अशा प्रकारचे आदेश दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष लागणार नाही.

वाचन

कोणतेही पुस्तक एका जागी सलग एक तास बसून वाचणे हे आव्हान आहे याचे कारण सैरभैर होणारे मन आणि त्याला खतपाणी घालणारी इतर व्यावधाने.  ‘मोबाईल’ हे त्यातले एक मुख्य कारण. त्यामुळे वाचन करताना मोबाईल जवळपास असू नये. कोणताही संदेश आल्यावर त्याची सूचना देणारे आवाज शक्यतो बंद करावेत. त्याचप्रमाणे नवीन संदेश आल्यावर त्यासंबंधी सूचना मोबाईलवर दिसू नयेत, अशी व्यवस्था करता येते. शालेय अभ्यास करताना रोज वेगवेगळ्या विषयाचे वाचन सलग एक तास करण्याचे नियोजन पालकांनी करून द्यावे. शालेय विद्यार्थ्यांची रोज सकाळी जागे होण्याची एक ठराविक वेळ असावी, त्यानंतर पहिले दोन तास काय करावे, याचे वेळापत्रक ठरलेले असावे. कोणत्याही घरामध्ये सकाळच्या वेळेत टीव्ही सुरु करू नये. टीव्ही बघता बघता अभ्यास करणे गैर आहेच. टीव्हीवरील कार्यक्रम बघतानासुद्धा पालकांनी मोबाईल लांब ठेवावा. एका वेळी एकच कृती करण्याचा आदर्श घालून देण्याचे काम पालक करू शकतात.  ज्या घरामध्ये पालक सकाळचा अर्धा तास वृत्तपत्र/पुस्तक वाचण्यात घालवतात, आई-वडील दोघेही रोज ठराविक वेळ पुस्तक वाचन करतात, त्या घरामधील पुढच्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी कमी कष्ट घ्यावे लागतात. चित्रपट अथवा नाटक बघताना पालक मोबाईल बघत असतील तर त्यांची मुले त्यापुढे दोन पावले जाणार, यात शंका नाही.

उपाय

‘एक तास पुस्तक वाचल्यावर एक तास मोबाईल बघायला देईन’ असे व्यवहार पालकांनी आपल्या मुलांबरोबर करू नयेत. पालकांनी मुलांना बरोबर घेऊन रोज किमान अर्धा तास व्यायाम करावा आणि रोज काही अंतर चालावे. आता व्यायामशाळेमध्ये व्यायाम करताना लक्ष वेधून घेणारे व्हिडियो दाखवण्याची व्यवस्था केलेली असते, ज्यामुळे लक्ष विचलित होत असते. वेगवेगळ्या क्रिनवर वेगळे व्हिडियो सुरु असतात, संगीत वेगळेच सुरु असते. त्याशिवाय व्यायाम करणाऱ्या व्यक्ती मोबाईल जवळ बाळगतात. त्यामुळे 15 बैठका तीन वेळा मारायच्या असल्यास त्यामधील आवश्यक असणाऱ्या विश्रांतीच्या अर्ध्या मिनिटामध्ये मोबाईल बघितला जातो. म्युझियम बघताना बालक-पालक चित्रे/फोटो/वस्तू बघण्याऐवजी मोबाईलवर फोटो काढतात. प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी-पक्षी यांच्याबद्दल लिहिलेली माहिती वाचून तो प्राणी/पक्षी बघण्याऐवजी तिथे मोबाईलवर फोटो काढण्यात वेळ फुकट घालवला जातो. त्यामुळे अशा ठिकाणी पालकांनी मोबाईलपासून दूर रहावे आणि मुलांना माहिती घेऊन काहीही निवांतपणे बघण्यास प्राधान्य द्यावे.

वाचन असो वा चित्रपट बघणे असो वा गायन-वादन-नृत्य किंवा संगीत ऐकण्याचा रियाज करण्यासारखी कोणतीही कृती सलगपणे करण्याची कुवत म्हणजे attाहूग्दह sज्aह वयानुसार बदलतो, उदा. दोन वर्षाच्या बालकाचा 4 ते 6 मिनिटे, चार वर्षे वयाच्या बालकाचा 8 ते 12 मिनिटे, सहा वर्षे (12 ते 18 मिनिटे), आठ वर्षे (16 ते 24 मिनिटे), दहा वर्षे (20 ते 30 मिनिटे) अशा प्रकारे वाढत जातो. हा कालावधी वाढवण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण याकडे लक्ष देण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना वेळ नसतो. त्यासाठी आपला आणि मुलांचा ‘क्रिन टाईम’ किती आहे याचे लेखी रेकॉर्ड ठेवावे. आपली मुले कोणती कृती सलग एक तास बसून करू शकतात याची यादी पालकांनी करावी. आयपॅडवर वाचन करणे किंवा चित्रे काढणे म्हणजे वाचन अथवा चित्रकलेची आवड जोपासणे नव्हे. आपल्या मुलांनी भान हरपून केलेली कृती कोणती याची माहिती पालकांना हवीच. अर्थात मुलांना अशी चांगली सवय लागण्यासाठी पालकांनी मुलांबरोबर वेळ घालवताना मोबाईलपासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यासाठी मुळात पालक दोन तास एकाग्रतेने बसून पुस्तक वाचताना दिसतात का? एकूणच लक्ष वेधणारे काय आहे आणि आपल्याला लक्षपूर्वक काय करायचे आहे.

गुरु ठाकूर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर...

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते

कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते

तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते?

कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते

जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते?

भाबडे तरी भासांच्या मागून पळते.

मन उधाण वाऱ्याचे....

-सुहास किर्लोस्कर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article