For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मन आणि तनही भाजपमय !

04:43 PM Apr 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मन आणि तनही भाजपमय
Advertisement

राजापूरच्या प्रचार सभेत सावंतवाडीचा दीपेश गाजतोय ; स्वतःचे शरीर रंगवून केले भाजपमय !

Advertisement

राजापूर

आज राजापूर येथे होत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेत सावंतवाडी येथील दीपेश शिंदे या युवकाने स्वतःचे शरीर रंगवून भाजपमय केले आहे . त्याचा हा लूक भर प्रचारसभेत चर्चेचा विषय ठरतोय . युवा उद्योजक तथा भाजपचे युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विशाल परब यांच्या सौजन्याने स्वतःचे शरीर दीपेश याने रंगवून घेतले आहे . एकीकडे उन्हाळ्याने तापमान वाढत असताना दुसरीकडे मात्र निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे . याच निमित्ताने प्रचारसभांना उत येत आहे . महायुतीचे लोकसभा सिंधुदुर्ग - रत्नागिरी मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ आज रत्नागिरीत धडाडत आहे . त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे असंख्य कार्यकर्ते , पदाधिकारी राजापूर येथील सभेस उपस्थित आहेत . या सभेत दीपेश याने स्वतःच्या शरीरावर कमळ रेखाटून भाजपच्या चिन्हाचा प्रचार करीत नारायण राणेंना दिल्लीचे तख्त भेदण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.