For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलादपूर नजीक भीषण अपघात; २ ठार, ३ गंभीर जखमी; उभ्या कंटेनरवर आदळली कार

03:07 PM May 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
पोलादपूर नजीक भीषण अपघात  २ ठार  ३ गंभीर जखमी  उभ्या कंटेनरवर आदळली कार
Fatal accident Poladpur
Advertisement

जखमी खानवली लांजा येथील

रायगड / प्रतिनिधी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच असून आज सकाळी १०  वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकर नगर समोर उभ्या असलेल्या कंटेनरला ( एन एल ०१ एई ३१५०) मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या  एम एच ०३ सी एस ११७७ या कारने मागील बाजूला भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने हा अपघात घडला.

Advertisement

या घटनेबाबत मिळालेल्या माहिती नुसार मुंबई दिशेकडून होंडा कंपनीची कार रत्नागिरी जिल्ह्यातील खानवली बने कडे सुट्टीसाठी जात असताना  भरधाव वेगाने जात असताना  कार चालकाचे नियंत्रण सुटले  आणि कार कंटेनर च्या मागील भागात जोराने आदळली. आणि कार कंटेनर च्या खाली घुसली. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यु झाला. यामध्ये मयत चालक अनिल भीमा शिंदे वय ४०  राहणार पुणे, व सुमती यशवंत शिंदे वय ७५ या दोघांचा जागीच मृत्यू झाला . तर जखमी निलेश अनंत दळवी राहणार खानवली लांजा, जानवी निलेश दळवी वय ४५, यश निलेश दळवी वय १८ सर्व राहणार खानवली लांजा. असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

या कार मध्ये ५ प्रवासी प्रवास करीत होते. या भीषण अपघातात २ जण जागीच मृत्युमुखी तर ०३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास ४५ मिनिटांचा कालावधी लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे पोलीस निरीक्षक अनिल जाधव पीएसआय श्री मांदळे, सर्व पोलीस कर्मचारी, कशेडी महामार्गाची पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे, व पोलीस कर्मचारी यांच्यासह पोलादपूर ग्रामस्थ राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.  नरवीर रेसक्यू टीम, श्री काळभैरवनाथ रेसक्यु टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेची माहिती समजतात महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.

Advertisement

Advertisement
Tags :

.