झोपेतून जागे करण्यासाठी मिळतात लाखो रुपये
महिन्याला 26 लाख कमावत असल्याचा दावा
कुठल्याही नोकरीवर न जाता आणि अधिक मेहनतीशिवाय लाखो रुपये कमावता येतात असा दावा एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने केला आहे. लोकांना चांगल्याप्रकारे झोपेतून जागे करण्यासाठी पैसे मिळतात. केवळ लोकांना जागं करून महिन्याला 26 लाख रुपये कमावत असल्याचा दावा जेकी बोहेमने केला आहे. तो स्वतःच्या खोलीत झोपतो आणि बेडवरूनच लोकांना जागविण्याची व्यवस्था करतो.
अलार्मद्वारे कमाई
तांत्रिकदृष्टय़ा तो स्वतःच्या अलार्मद्वारे पैसे कमावताहे. जेकी बोहेमने अतिरिक्त कमाईसाठी ही अजब कल्पना शोधून काढली आणि आता तो लाखो रुपये कमावत आहे. त्याने स्वतःच्या बेडरुमला लेझर, स्पीकर, बबल मशीन आणि अशा अनेक गोष्टींनी भरून टाकले आहे. या गोष्टी कुणाच्या झोपेत विघ्न आणू शकतात. इंटरॅक्टिव्ह लाइव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून प्रेक्षक बोहेमच्या बेडरुममध्ये ठेवण्यात आलेल्या उपकरणांना नियंत्रित करू शकतात. प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
अनोखी कल्पना
बोहेम स्वतःच्या काही फॉलोअर्सना काही पैशांच्या बदल्यात ही सेवा पुरवितो. फॉलोअर्स अलार्मसाठी कुठलेही गाणे निवडू शकतात आणि याला त्रास देणारे लाइट शो किंवा अन्य गोष्टींसोबत जोडू शकतात. बोहेमचे टिकटॉकवर 5.2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हे फॉलोअर्स त्याला दरदिनी जागे करण्यासाठी चांगली रक्कम देतात.
खोलीत अनेक गोष्टी एक सिंगल गिफ्ट आणि एक साउंड रिक्वेस्टच्या स्वरुपात प्रारंभ झाला होता. आता आमच्याकडे लाइट्स, बबल मशीन, इनफ्लॅटेबल, लेझर लाइट आणि 20 हून अधिक साउंड इफेक्ट्स आहेत. प्रत्येक रात्र एकसारखीच असते, दर 10-15 सेकंदामंध्ये एक साउंड किंवा लाइट ऍक्टिव्ह होते. माझे लव्ह स्लीप सेशन दररात्री 7 तास चालते. फॉलोअर्सना जागे करण्यास सक्षम करणाऱया आणखी सुविधा जोडू इच्छित असल्याचे 28 वर्षीय बोहेमने म्हटले आहे.