For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्राझीलमध्ये रस्त्यांवर उतरले लाखो लोक

06:32 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्राझीलमध्ये रस्त्यांवर उतरले लाखो लोक
Advertisement

माजी अध्यक्षांवरील आरोपांना दर्शविला विरोध

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्राझिलिया

ब्राझीलचे माजी अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचे 7 लाखाहून अधिक समर्थक पुन्हा एकदा रस्त्यांवर उतरले आहेत. बोल्सोनारो यांच्यावर करण्यात आलेले सत्तापालटाच्या प्रयत्नांच्या आरोपांना या समर्थकांना विरोध दर्शविला आहे. तसेच निवडणुकीत सामील होण्यावर घातलेल्या बंदीला विरोध केला आहे.

Advertisement

भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री उशिरा बोल्सोनारो यांची जानेवारी 2023 मध्ये झालेल्या हिंसेवरून चौकशी करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2022 मधील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बोल्सोनारो यांनी सत्तापालट करविण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप आहे. हे आरोप बोल्सोनारो यांनी फेटाळले आहेत.

रस्त्यांवर सैन्याचे रणगाडे उतरले, लोकांच्या हाती शस्त्रास्त्रs असली तरच सत्तापालट होत असतो. जानेवारी 2023 मध्ये असे काहीच घडले नाही. सत्तापालटाचा प्रयत्न मी केला नाही असा दावा बोल्सोनारो यांनी केला आहे.

ब्राझीलमध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये अध्यक्षीय निवडणूक झाली होती. या निवडणुकीत बोल्सोनारो हे पराभूत झाले होते. तर लइgज इनासियो लूला डा सिल्वा यांचा विजय झाला होता. 1 जानेवारी 2023 रोजी लूला डा सिल्वा यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली होती. तर 8 जानेवारी 2023 रोजी बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अध्यक्षीय प्रासादात शिरून तोडफोड केली होती. या घटनेनंतर बोल्सोनारो यांच्यावर जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप झाला होता.

Advertisement
Tags :

.