जलाशयात सोडणार लाखो मत्स्यबिज
मत्स्य खात्याची तयारी, उत्पादन वाढीसाठी प्रयत्न
► प्रतिनिधी / बेळगाव
खरिप हंगामाला प्रारंभ झाल्याने विविध नद्या, जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मत्स्य खात्यामार्फत मत्स्यबिज सोडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या आठवड्याभरात लाखो मत्स्यबिज (माशाची पिले) सोडली जाणार आहेत. गतवर्षी विविध जलाशयात सोडलेल्या मत्स्यबिजापासून 90 लाख टन माशांचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे यंदादेखील मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी खात्याचे प्रयत्न राहणार आहेत.
विविध जलाशयांमध्ये मत्स्यबीज सोडण्यासाठी 90 लाख माशांच्या पिलांचे उत्पादन घेण्यात आले आहे. विशेषत: हिडकल आणि राकसकोप व इतर जलाशयातून ही पिल्ले सोडली जाणार आहेत. गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जलाशयाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली होती. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम झाला होता. मात्र यंदा जून आणि जुलै महिन्याच्या पंधरवड्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मत्स्य खातेही वेळेत मत्स्यबिज (माशाचे पिल्ले) सोडण्यासाठी सज्ज झाले आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतगृ अनुसूचित जाती जमातीसाठी आणि सामान्य महिलांसाठी 60 टक्के तर सामान्य नागरिकांसाठी 40 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे अलिकडे मत्स्यपालन करण्याची संख्याही वाढू लागली आहे. काही शेतकरी शेततळ्याची निमी करून मत्स्यपालन करू लागले आहेत. त्यामुळे सहाजिकच उत्पादन वाढू लागले आहेत. विशेषत: राहू, काटला, गिरमल, मृगळ आदी जातींचा समावेश आहे.
मत्स्यबिजाचे उत्पादन
सौंदत्ती तालुक्यातील नवलतीर्थ आणि हिडकल जलाशयाच्या फार्ममध्ये मत्स्यबिजाचे (माशाचे पिल्लांचे) उत्पादन केले जाते. नवलतीर्थ फार्ममध्ये 15 लाख तर हिडकल जलाशयात 25 लाख माशांची पिले सोडण्यात आली आहेत. त्याबरोबर राकसकोप, मलप्रभा जलाशयातदेखील अधिक माशांची पिले सोडली जाणार आहेत.
वसंत हेगडे सहसंचालक मत्स्यखाते
मत्स्य व्यवसायाला अनुकूल व्हावे, यासाठी विविध योजना राबविल्या जातात. यंदा विविध जलाशयातून लाखो मत्स्यबिज सोडली जाणार आहेत. याबाबतची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात मत्स्यबिज (माशांची पिले)सोडली जाणार आहेत. हिडकल, राकसकोप, मलप्रभा आणि सौंदत्ती तालुक्यातील जलाशयाचा वापर होणार आहे.