कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उंटाचे केस विकून होत आहेत लक्षाधीश

06:05 AM Sep 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खास ब्लँकेटची करत आहेत निर्मिती

Advertisement

हिवाळ्यात उबदार अन् आरामदायी बेडचा शोध प्रत्येकाला असतो. मनालीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी रात्रीचे तापमान शून्याखाली पोहोचते, तेथे एक चांगले ब्लँकेट कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही. उंटाचे दूध आणि मांसासोबत त्याचे केसही मूल्यवान आहेत. त्याद्वारे तयार करण्यात आलेले ब्लँकेट उबदार आणि मुलायम असतात. उंटाच्या केसाद्वारे निर्मित ब्लँकेट स्वत:च्या अनोख्या वैशिष्ट्यांसाठी पूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. हे ब्लँकेट मुख्यत्वे मंगोलिया, पश्चिम चीन आणि रशियासाररख्या थंड अणि प्रतिकूल हवामान असलेल्या क्षेत्रांमध्ये आढळून येणाऱ्या बॅक्ट्रियन उंटाच्या केसांपासून तयार केले जातात.

Advertisement

उंटाचे केस दोन प्रकारचे असतात, बाहेरील जाड केस (गार्ड हेअर) आणि आतील मुलायम रेशा (डाउन हेअर) असे हे प्रकार आहेत. या ब्लँकेटसाठी केवळ मुलायम डाउन हेअरचा वापर होतो, जे अत्यंत हलके, रेशमी आणि उबदार असतात. या ब्लँकेटचे वैशिष्ट्या म्हणजे ते तापमानाला संतुलित ठेवतता. मंगोलियाच्या गोबी वाळवंटात दिवसा तापमान 40 अंशापर्यंत तर रात्री उणे 40 अंशापर्यंत असते. उंट स्वत:च्या केसांच्या मदतीने या टोकाच्या स्थितीत जिवंत राहतो. हाच गुण या ब्लँकेट्सना थंड हवेच्या ठिकाणासाठी आदर्श ठरवितो. हे ब्लँकेट ओलावा वेगाने शोषून घेतात आणि शरीराला कोरडे आणि उबदार ठेवतात.

उंटाच्या केसांचा आणखी एक अनोखा गुण म्हणजे त्यांचे हायपोएलर्जेनिक  स्वरुप. हे लोकरापासून तयार ब्लँकेटची एलर्जी असलेल्या लोकांसाठी चांगले आहे. याचबरोबर हे ब्लँकेट गंध आणि डागांबद्दल प्रतिरोधक असतात, यामुळे हे दीर्घकाळापर्यंत वापरले जाऊ शकतात. त्यांची देखभाल सोपी असते, परंतु त्यांना वारंवार धुण्याची गरस नसते. या ब्लँकेटची किंमत सामान्य ब्लँकेट्सपेक्षा अधिक असते. एका उच्च गुणवत्तायुक्त ब्लँकेटची किंमत 5 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत असू शकते. ही किंमत त्याची दुर्लभता आणि उत्पादन प्रक्रियेवर निर्भर असते. मंगोलियाचे गोबी कॉर्पोरेशन सारखे ब्रँड या ब्लँकेट्सना ऑर्गेनिक आणि नैतक स्वरुपात प्राप्त सामग्रीने तयार करतात, यामुळे पर्यावरणालाही नुकसान पोहोचत नाही.

या बँकेटची बनावटही खास असते. काही ब्लँकेट्स अनिचिनीच्या काराकोरकम कलेक्शन, हँडवूवन आणि 4-प्लाय ट्विल विणून तयार केले जातात. यामुळे ते आणखी टिकावू आणि आकर्षक होतात. यात काश्मिरी बाइंडिंगचा वापर होतो. हे ब्लँकेट्स नैसर्गिक रंगात उपलब्ध होतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article