For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘डॅमसल’मध्ये मुख्य भूमिकेत मिली

09:10 PM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘डॅमसल’मध्ये मुख्य भूमिकेत मिली

फॅन्टेसी थ्रिलर स्वरुपाचा चित्रपट

Advertisement

नेटफ्लिक्सची सुपरनॅशनल थ्रिलर वेबसीरिज ‘स्ट्रेंचर थिंग्स’मुळे जगभरात प्रसिद्ध झालेली मिली बॉबी ब्राउन नेटफ्लिक्सवर नव्या चित्रपटासोबत परतणार असून याचे नाव ‘डॅमसल’ आहे. या चित्रपटात मिली एका राजघराण्याच्या सूनेची भूमिका साकारत आहे. या महिलेला शतकांपेक्षा जुन्या शापापासून मुक्तीसाठी मृत्यूच्या दारात ढकलण्यात येते, परंतु ती सूड उगविण्यासाठी परतत असल्याचे या चित्रपटात दाखविले जाणार आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

डॅमसल हा फॅन्टेसी थ्रिलर चित्रपट असून तो राजकन्येचे शौर्य आणि बचावासाठी केलेल्या संघर्षाची कहाणी दर्शविणारा आहे. या राजकन्येला एका अशा गुहेत ढकलेले जाते, ज्यात शतकांपासून एक ड्रॅगन कैद आहे. राजघराणे परंपरेच्या नावावर निष्पाप मुलींचा बळी घेत असते आणि मिलीने साकारलेली व्यक्तिरेखा या परंपरेचा अंत करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

Advertisement

डॅमसलचे दिग्दर्शन जुआन कार्लोस फ्रेसनॅडिलो यांनी केले आहे. या चित्रपटात मिलीसोबत रे विंसटन, निक रॉबिन्सन, रॉबिन राइट आणि एंजेला बेसेट हे कलाकार दिसून येणार आहेत. 19 वर्षीय मिली ही स्ट्रेंचर थिंग्स या सीरिजमुळे चर्चेत आली होती.  यापूर्वी तिने नेटफ्लिक्सच्या एनोला होम्समध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

Advertisement

Advertisement
×

.