For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जानेवारीपासून दूध दर 5 रुपयांनी वाढणार

10:17 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
जानेवारीपासून दूध दर 5 रुपयांनी वाढणार
Advertisement

बेंगळूर : राज्य सरकारने यापूर्वी दूध दरवाढीचे संकेत दिले होते. गुरुवारी पशूसंगोपन मंत्री के. वेंकटेश यांनी येत्या जानेवारीपासून दूध दरवाढ होणार असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनधन वाढीसाठी दूध दरात प्रतिलिटर 5 रुपयांनी वाढ करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चामराजनगर येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना पशूसंगोपन मंत्री के. वेंकटेश म्हणाले, दूध दरात प्रतिलिटर 5 रु. वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच दूध दरवाढ करण्यात येईल. दूध पुरवठा मंडळांकडून शेतकऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या दरात 5 रु. वाढ करण्यात येईल. जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. सध्या शेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 33 रु. दर दिला जात आहे. यापूर्वी हा दर 35 रु. होता. खरेदी दरात 5 रुपयांनी वाढ करण्यास मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: संमती दर्शविली आहे, असे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.