For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारी शाळांतील एलकेजी, युकेजीसाठी दूध, अंडी, केळी

11:02 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
सरकारी शाळांतील एलकेजी  युकेजीसाठी दूध  अंडी  केळी
Advertisement

शालेय शिक्षण-साक्षरता खात्याचा आदेश

Advertisement

बेंगळूर : राज्यातील सरकारी शाळांमध्ये विविध योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांमधील (एलकेजी, युकेजी) विद्यार्थ्यांनाही मध्यान्ह आहार, क्षीरभाग्य योजनेंतर्गत दूध, पोषण आहार योजनेंतर्गत अंडी, केळी वितरित करण्याचा आदेश शालेय शिक्षण-साक्षरता खात्याने दिला आहे. मागील आठवड्यात सरकारने हा निर्णय घेतला होता. कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये (केपीएस) सुरू करण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांमध्ये शिकणाऱ्या मुलांना महिला व बालकल्याण खात्यामार्फत 2019-20 सालापासून मध्यान्ह भोजन अंतर्गत उपाहार, गरम दूध व दुपारचे जेवण दिले जाते. आता एसडीएमसी मार्फत सुरू करण्यात आलेले पूर्व प्राथमिक वर्ग, पीएमश्री योजनेंतर्गत कल्याण कर्नाटक भागात सुरू केलेल्या शाळांमधील एलकेजी, युकेजीतील मुलांना 2025-26 सालातील अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे 1 डिसेंबर 2025 पासून लागू होईल याप्रमाणे पोषण शक्ती निर्माण योजना जारी करावी. या योजनेंतर्गत मध्यान्ह आहार तसेच क्षीरभाग्य योजनेंतर्गत दूध व पोषक आहार असणारी अंडी, केळी वितरण करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.