सैन्यवाहनाला दिले हॉटेलचे स्वरुप
1 रात्र वास्तव्यासाठी 10 हजाराचे शुल्क
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सध्या नव्या डिझाइन्स आणि संकल्पनांची हॉटेल्स तयार होत आहेत. पाण्याखाली हॉटेल तयार करत तेथे खोल्या तयार करण्यात येत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. परंतु आता एका ठिकाणी बॉम्ब डिफ्यूज करणाऱ्या वाहनालाच हॉटेलचे स्वरुप देण्यात आले आहे. हा एकप्रकारचा ट्रक असून ज्यात एक रात्र वास्तव्यासाठी 10 हजार रुपये खर्च करावे लागतात.
इंग्लंडच्या सोमरसेटमध्ये हॅच बीचम नावाचे गाव असून तेथे आर्मी ट्रकला हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. हे वाहन बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी तयार करण्यात आले होते. परंतु आता याला हॉटेलचे स्वरुप देण्यात आले आहे. यात दोन जणांच्या वास्तव्यासाठी जागा असून यात पाळीव प्राण्यालाही सोबत ठेवू शकता, कारण हे पेट फ्रेंडली आहे.
आर्मी ट्रकमध्ये किंग साइज बेड असून शांत प्राण्यांनाही लोक यात आणू शकतात. या हॉटेलमध्ये बाथरुम, किचन आणि वाय-फायची सुविधा आहे. बाथरुम अत्यंत अनोखे आहे कारण हे हॉर्स बॉक्सला कन्वर्ट करत प्रायव्हेट शॉवर आणि टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रक बाहेर बारबेक्यू, डायनिंग फर्निचर असून या ट्रकचे नाव ‘आर्नी द आर्मी ट्रक’ आहे.
1987 मधील ट्रक
हा 1897 चा एक मिलिट्री ट्रक होता, जो बॉम्बविरोधी पथकासाठी निर्माण करण्यात आला होता. ट्रकबाहेरच टेबल अन् खुर्ची लावण्यात आली असून तेथे लोक निसर्गाचा आनंद घेत जेवू शकतात.