कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लष्करी वाहनाला अपघात; तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू

06:31 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रामबनमध्ये लष्कराचे वाहन 700 फूट खोल दरीत कोसळले

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात रविवारी लष्कराचे एक वाहन 700 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात तीन सैनिकांचा मृत्यू झाला. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत सैनिकांची नावे आहेत. अपघातग्रस्त वाहन जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या लष्करी ताफ्याचा भाग होते. सकाळी 11:30 वाजता जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग 44 वर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, पोलीस, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य राबविण्यात आले.

रामबनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीनंतर चिखल साचल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग-44 दोन्ही बाजूंनी बंद होता. याचदरम्यान वाहतूक सुरू झाल्यानंतर लष्करी वाहनाला अपघात घडला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तीन सैनिकांची ओळख पटली आहे. शिपाई अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी त्यांची नावे आहेत. अपघातानंतर वाहनाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून खंदकातून सैनिकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यापूर्वी, 4 जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने चार सैनिकांचा मृत्यू झाला होता. तसेच दोन सैनिक गंभीर जखमी झाले होते. सदर ट्रकमध्ये फक्त 6 सैनिक होते.

अलर्ट आधीच जारी

रामबनमध्ये शुक्रवारी ढगफुटीमुळे बरेच नुकसान झाले होते. राष्ट्रीय महामार्ग-44 ची स्थिती बिकट झाली. रस्त्यावर चिखल आणि ढिगारा पसरल्यामुळे महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करावा लागला. प्रशासनाने आधीच अलर्ट जारी करत महामार्ग मोकळा असल्याची माहिती मिळाल्यानंतरच प्रशासनाने लोकांना प्रवास करण्याचा इशारा दिला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article