माइली साइरसची प्रियकरासोबत एंगेजमेंट
मॅक्स मोरांडोसोबत रिलेशनशिपमध्ये
अमेरिकन गायिका माइली साइरसने जवळपास 4 वर्षांच्या डेटिंगनंतर संगीतकार मॅक्स मोरांडोसोबत एंगेजमेंट केली आहे. माइलीने लॉस एंजिलिसमध्ये ‘अवतार : फायर अँड ऐश’च्या वर्ल्ड प्रीमियरमध्ये रेड कार्पेटवर दर्शन येत स्वत:ची कोट्यावधी रुपयांची डायमंड रिंग प्रदर्शित केली आहे.
तिच्या बोटातील हीऱ्याच्या अंगठीने सर्वांचे त्वरित लक्ष वेधून घेतले. ज्वेलरी इन्फ्लुंएसर जूलिया चाफेने ही अंगठी सुमारे 1.34 कोटी रुपयांची असल्याचे सांगितले आहे. या अंगठीला जॅकी ऐशने डिझाइन पेले असून यात सोन्याने निर्मित मोठ्या सिगार बँडवर 4 कॅरेटचा लांब कुशन-कट हिरा जडविण्यात आलेला आहे. जेव्हा आम्ही स्वप्ने पाहतो ,तेव्हा आम्ही एकत्रित स्वप्ने पाहतो अशी कॅप्शन माइलीने फोटो शेअर करत दिली आहे. माइली आणि मॅक्स यांच्यातील रिलेनशिप डिसेंबर 2021 मध्ये सुरू झाले होते. यापूर्वी माइलीने अभिनेता लियाम हेम्सवर्थसोबत विवाह केला होता. परंतु त्यांचा 2018 मध्ये झालेला हा विवाह काही काळच टिकला. 2019 साली त्यांचा घटस्फोट झाला होता. माइलीचा प्रियकर मॅक्स हा मल्टी-इंन्स्ट्रुमेंटलिस्ट म्युझिशियन आहे. त्याला लॉस एंजिलिस रॉक बँड लिलीचा ड्रमर म्हणून ओळखले जाते. तो म्युझिक प्रॉड्यूसर देखील आहे.