महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रहस्यमय पत्रांमुळे ग्रामस्थांचे स्थलांतर

06:02 AM Oct 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्रिटनच्या गावावर ओढवले विचित्र संकट

Advertisement

एखाद्याला धमकीयुक्त पत्र मिळाल्याचे वृत्त वाचनात आले असेल, अनेकदा एखाद्याचा शत्रू अशाप्रकारच्या कृत्यांद्वारे त्याला घाबरविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अलिकडेच इंग्लंडच्या ईस्ट यॉर्कशायरमधून काहीसे अजब आणि भीतीदायक वृत्त समोर आले आहे.

Advertisement

येथील गाव शिप्टोनथॉर्पच्या जवळपास सर्व लोकांना अशाप्रकारचे रहस्यमय पत्र 2 वर्षांपासून प्राप्त होत आहे. अज्ञात लेखकाच्या या पत्रांना अश्लील आणि टार्गेटेड ठरविले जात आहे. हंबरसाइड पोलीस धमकी आणि शिव्यायुक्त पत्रांच्या या अजब प्रकरणाचा तपास करत आहेत.

डिसेंबर 2022 मध्ये असे एक पत्र मिळाल्यावर मला धक्काच बसला होता. त्यावेळी मी एका वॉर्डची प्रतिनिधी म्हणून काम करत होते आणि पत्रातील मजकूर भीती निर्माण करणारा होता. पत्र लिहिणाऱ्याने मला चरित्रहीन संबोधिले होते. राजकारणात पुढे जाण्यासाठी माझ्याकडे केवळ चुकीचा मार्ग स्वीकारण्याचा पर्याय असल्याचे पत्रात नमूद होते असे एका स्थानिक महिलेने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले आहे.

या पत्रांविषयी माहिती मिळाली आहे. याप्रकरणी वेळोवेळी चौकशी करण्यात येत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही पडताळून पाहिले जात आहे. परंतु अद्याप काहीच हाती लागलेले नाही असे हंबरसाइड पोलिसांकडून सांगण्यात आले.

संबंधित महिलेला सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या महिलेला आतापर्यंत एकूण 4 पत्रे मिळाली आहेत. या महिलेसोबत अन्य ग्रामस्थांनाही त्रास देणारी अशी पत्रे प्राप्त झाली आहेत. एका इसमाला लिहिलेल्या पत्रात तुला कॅन्सरसारखा गंभीर आजार होईल असे म्हटले गेले होते. या अनोळखी व्यक्तीच्या पत्रांमुळे आता लोक गाव सोडून जात आहेत.

हा प्रकार 1920 मधील कुख्यात लिटिलहॅम्प्टनच्या किस्स्याची आठवण करून देणारा आहे. तेथील लोकांनाही अशाप्रकारची भीतीदायक पत्रे येत होती. या प्रकरणामुळे दीर्घकाळापर्यंत क्षेत्रात दहशत निर्माण झाली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article