महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मिग 29 के’चा टायर फुटल्याने दाबोळीतील हवाई सेवेत व्यत्यय

12:54 PM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हवाई वाहतूक तीन तास बंद : अकरा विमाने वळवली अन्यत्र : अपघाताची चौकशी नौदलांतर्गंत करणार

Advertisement

वास्को : दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर उड्डाणच्या तयारीत असलेल्या नौदलाच्या मिग 29 के विमानाचा टायर अचानक फुटल्याने बाका प्रसंग उद्भवला. सुदैवाने कुणी जखमी वा विमानाच्या चाका व्यतिरिक्त कसलीही हानी झाली नाही. ही घटना काल मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. नौदलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नौदलाचे मिग 29 के विमान नियमित सरावासाठी उड्डाण करणार होते. वैमानिकाने विमानाचे उड्डाण करण्यासाठी प्रयत्न केला असता विमानाचे एक चाक फुटल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यांनी खाली उतरून पाहिले असता टायर फुटून आग व धूर येत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित हवाई नियंत्रण कक्ष व नौदलाच्या आपत्कालीन विभागाला माहिती दिली. त्यामुळे सुरक्षा पथक व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने त्वरित आग विझवून घटनेवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर हे विमान क्रेनच्या साहाय्याने धावपट्टीवर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या एक आसनी विमानात अन्य कुणी नव्हते. सुदैवाने या घटनेत अन्य कोणतेही नुकसान झाले नाही. या अपघाताची चौकशी नौदलांतर्गंत करण्यात येणार आहे.

Advertisement

 हवाई उड्डाणे तीन तास बंद

दाबोळी विमानतळावर मिग 29 के विमानाला अपघात झाल्याने धावपट्टीच्या तपासणीसाठी तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दाबोळीतील हवाई उड्डाणे भारतीय विमानतळ प्राधिकरणने रद्द केली. त्यामुळे अगदी हवाई जहाजांच्या वर्दळीच्या वेळेतच हवाई सेवा खंडीत झाली. तीन तास विमानांचे उड्डाण व आगमन बंद होते.

 अकरा विमाने इतरत्र वळवली

दाबोळी विमानतळ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातानंतर विविध शहरांकडून दाबोळी विमानतळाकडे येणारी तब्बल अकरा विमाने जवळच्या मोपा मनोहर विमानतळाकडे तसेच पुन्हा मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बेंगळूर व इतर विमानतळांकडे वळवण्यात आली. काही विमाने संध्याकाळी उशिराने दाबोळीकडे दाखल झाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article