Sangli Crime : कुपवाडमध्ये मध्यरात्री गोळीबार; रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला !
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमीवर उपचार सुरू
कुपवाड : आर्थिक कारणातून झालेल्या वादातून कुपवाडमधील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांनी दुसरा रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश उर्फ पिल्या आनंदा पारछे (वय २८. रा. सिद्धनाथ कॉलनी, भारत सूतगिरणी जवळ, कुपवाड) याच्यावर गोळीबार केल्याची घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. यात पारछे याच्या डाव्या मांडीला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या चार तासात संशयित दोघांना गजाआड केले. जखमीवर सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार अटक गणेश सुरू आहेत. केलेल्यामध्ये संशयित राहूल सुभाष माने (वय ३४, रा. संकल्पनगर, बामणोली ता. मिरज) व सदाशिव खोत (वय ३५, रा. शांत कॉलनी, कुपवाड) अशी अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे आहेत.
संशयित राहूल व गणेश तसेच जखमी पारछे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पारछे विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हे तर माने व खोत विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मानेगणेश खोत रविवारी मध्यरात्री हे तिघे भारत सूतगिरणी चौकातून कुपवाडकडे चारचाकी वाहनातून (एम. एच. १०, ई. आर. ८२६२) जात होते. संशयित राहूल माने व त्याचा मित्र गणेश खोत या दोघांचा महेश पारछे याच्या सोबत आर्थिक कारणातून वाद झाला
यावेळी गणेश खोत याने महेश पारछे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून तुला जीवंत ठेवत नाही अशी दमदाटी व धमकी दिली. संशयित राहूल माने याने चिडून महेश पारछे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली.
सदरची गोळी पारछे याच्या डाव्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. जखमीवर सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
तांत्रिक माहितीच्या आधारे कुपवाड पोलिसांनी संशयित राहूल माने व गणेश खोत यांना अटक केले. गुन्हेगारांनी गुन्ह्यात वापरलेली १५ लाख रुपये किंमतीची चारचाकीपोलिसांनी जप्त केली. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.