For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांचे आंदोलन

10:20 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Advertisement

बेळगाव : सरकारी व अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह आहार बनविणाऱ्या स्वयंपाकी व साहाय्यिकांना किमान वेतन कायद्यांतर्गत मासिक वेतन द्यावे या मागणीसाठी मंगळवारी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील मोठ्या संख्येने मध्यान्ह आहार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. कर्नाटक राज्य मध्यान्ह आहार कर्मचारी संघ (एआयुटीयुसी) च्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व साप्ताहिक रजा, राष्ट्रीय सण व प्रसुती रजा देण्यात यावी, सुटीच्या दिवशी काम करणाऱ्यांना दुप्पट वेतन द्यावे, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत वेतन जमा करावे, सेवानिवृत्तीनंतर 5 लाख रुपये खात्यामध्ये करावी, अशी मागणी मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली. मंगळवारी दुपारी परिवहन मंत्री रामलिंग रे•ाr यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.