महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मायक्रोसॉफ्ट’ हळूहळू पूर्ववत

07:00 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काही सेवा शनिवारीही प्रभावित : विमानतळावर फेस रीडिंग सिस्टम डिजीयात्रामध्ये समस्या

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

मायक्रोसॉफ्टच्या क्राउडस्ट्राईक अपडेटमुळे शुक्रवारी जगभरातील संगणक प्रणाली प्रभावित झाल्यानंतर व्यवसाय आणि सेवा हळूहळू पूर्ववत होत आहेत. पहाटे 3 वाजल्यापासून सर्व विमानतळांवर विमानसेवा यंत्रणा सामान्यपणे काम करू लागली आहे. आता विमानो•ाणे सुरळीतपणे सुरू आहेत, असे भारताच्या नागरी उड्डायन मंत्रालयाने सांगितले. मात्र, काही ठिकाणी अजूनही विमानतळावरील फेस रिडींग सिस्टीममध्ये समस्या उद्भवत असल्याचा दावा केला जात आहे

संगणक प्रणालीमध्ये शुक्रवारी निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे काही अनुशेष असून तो हळूहळू दूर केला जात होता. शनिवारी दुपारपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी आशा सकाळच्या सुमारास व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार बहुतांश सेवांचे काम सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशांना या बिघाडाचा मोठा फटका बसला तरी भारतात मात्र याची तीव्रता फारच कमी जाणवल्याचा दावा केला जात आहे. या बिघाडाचा मायक्रोसॉफ्टवर परिणाम जाणवला असला तरी अॅपल आणि लिनक्स वापरकर्त्यांना याचा फटका बसलेला नाही.

क्राउडस्ट्राईक सीईओंनी मागितली माफी

अमेरिकन अँटी-व्हायरस कंपनी क्राउडस्ट्राईकचे सीईओ जॉर्ज कुर्ट्झ यांनी जगभरातील विविध सेवांमध्ये निर्माण झालेल्या समस्येबद्दल माफी मागितली आहे. आता कंपनीने समस्या सोडवली आहे, परंतु सर्व यंत्रणा सामान्यपणे चालण्यास थोडा वेळ लागू शकतो. क्राउडस्ट्राईक सर्व प्रणाली पुनर्संचयित झाल्याची खात्री करण्यासाठी सर्व प्रभावित ग्राहक आणि भागीदारांसोबत जवळून काम करत आहे, असे त्यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

जगभरात 4,295 उड्डाणे रद्द

मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिममधील बिघाडाचा सर्वाधिक परिणाम विमानतळावर दिसून आला. शुक्रवारी जगभरात सुमारे 4,295 उ•ाणे रद्द करावी लागली. एकट्या अमेरिकेत 1,100 उड्डाणे रद्द तर 1,700 विमानांना विलंब झाला. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 10:40 वाजता त्याचा प्रभाव दिसायला प्रारंभ झाला होता. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळूरसह देशातील प्रमुख विमानतळांवर मोठी गर्दी दिसून आली. ऑनलाईन सेवा ठप्प झाल्यामुळे अनेक विमानतळांवर फ्लाईट बोर्डिंग पास हाताने देण्यात आले. अशा व्यापक परिणामामुळे हे इतिहासातील सर्वात मोठे ‘आयटी’ संकट बनले आहे. याला ‘डिजिटल महामारी’ असेही म्हटले जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article