For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘एमजी’च्या तीन नव्या ईव्ही कार्सचे अनावरण

06:49 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘एमजी’च्या तीन नव्या ईव्ही कार्सचे अनावरण

सायबरस्टर ही भारतातील पहिली पूर्ण इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार

Advertisement

मुंबई :

जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने बुधवारी ‘सायबरस्टर’ या सर्व-इलेक्ट्रिक परिवर्तनीय रोडस्टरचे अनावरण केले. ही भारतातील पहिली पूर्ण-इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असेल जी दोन मोटर्सद्वारे चालविली जाते. सायबरस्टर 3.2 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग घेऊ शकते.

Advertisement

सायबरस्टर व्यतिरिक्त, एमजी मोटरने मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात आणखी दोन इलेक्ट्रिक कार एमजी 5 आणि एमजी 4 प्रदर्शित केल्या. एमजी-5 आणि एमजी 4 युरोपियन बाजारात आधीच उपलब्ध आहेत आणि त्याच वैशिष्ट्यांसह लवकरच भारतात लॉन्च केल्या जाऊ शकतात.

Advertisement

3 महिन्यात एक कार लाँचचा विचार

या तीन कारच्या अनावरणावर टिप्पणी करताना, जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले की, कंपनीला दर 3-4 महिन्यांनी एक नवीन इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करायचे आहे. मारुतीने 90 च्या दशकात नवीन गाड्या आणल्या आणि आता त्यांच्याकडे 50 टक्के बाजारातील हिस्सा आहे. एमजीसह जेएसडब्ल्यू नवीन ऊर्जा वाहन तयार करू शकते. तेल आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी नवीन ऊर्जा वाहनांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
×

.