For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इलेक्ट्रीक वाहन : फेम-2 अंतर्गत 90 टक्के रक्कम केली खर्च

06:03 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
इलेक्ट्रीक वाहन   फेम 2 अंतर्गत 90 टक्के रक्कम केली खर्च
Advertisement

अवजड मंत्रालयाची माहिती : 10253 कोटी खर्च : दुचाकी, तिचाकी, चारचाकी कंपन्यांनी उठवला लाभ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने फेम 2 (इAश्)िं  ही महत्त्वाकांक्षी योजना राबवलेली असून या अंतर्गत आतापर्यंत 90 टक्के रक्कम खर्च करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

अवजड उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने पाच वर्षाच्या कालावधीसाठी फेम-2 अंतर्गत 11,500 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी 10,253 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर येते आहे. सदरच्या रकमेचा वापर गेल्या पाच वर्षांमध्ये 15 लाख वाहनांकरता प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आला आहे.

 तिचाकी, चारचाकीचा वाटा

यामध्ये तिचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोत्साहनासाठी अधिक रक्कम वापरली गेली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याकरिता 991 कोटी रुपयांची तरतूद होती, त्या सर्व रक्कमेचा वापर करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ बस श्रेणी गटामध्ये 991 कोटी रुपयांपैकी 94 टक्के रक्कम वापरली गेली आहे.

इलेक्ट्रिक दुचाकींचा विचार करता 4,756 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, ज्या अंतर्गत 90 टक्के रक्कम खर्चण्यात आली आहे.

निधीमधील सर्वाधिक रक्कम ही इलेक्ट्रिक चार वाहनांच्या प्रोत्साहनाकरता वापरली गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 64 टक्के इतकी रक्कम खर्चली गेली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जरकरिता 839 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी 633 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

रक्कमेत वाढ

ऑक्टोबर 2023 मध्ये या योजनेवर खर्चाचे लक्ष्य 10 हजार कोटी रुपयांवरुन 11,500 कोटी रुपयांचे निर्धारित केले होते. 2015 मध्ये सरकारने या योजनेकरता सुरुवातीला 900 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर 2019 मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ही रक्कम वाढवून 10 हजार कोटी केली गेली.

या कंपन्यांचा अर्ज

या योजनेकरिता एथर एनर्जी, बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्प, ओला इलेक्ट्रिक आणि महिंद्रा यांच्यासह 11 इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांनी अर्ज केला होता. आर्थिक वर्ष 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये 41 टक्क्यांची वाढ दिसली आहे. या आर्थिक वर्षांमध्ये 16 लाखहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :

.