For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेक्सिकोचा जमैकावर निसटता विजय

06:35 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मेक्सिकोचा जमैकावर निसटता विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ होस्टन

Advertisement

कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात मेक्सिकोने जमैकाचा 1-0 असा निसटता पराभव करत आपली विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील ब गटातील झालेल्या सामन्यात व्हेनेझुएलाने इक्वेडोरचा 2-1 असा पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. आता मेक्सिकोचा पुढील फेरीतील सामना व्हेनेझुएलाशी येत्या बुधवारी तर जमैकाचा पुढील सामना इक्वेडोरबरोबर लास व्हेगास येथे बुधवारी होईल. 30 जून रोजी प्राथमिक फेरीची समाप्ती होणार आहे.

या सामन्यात दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. सामन्यातील 69 व्या मिनिटाला गेरार्दो आर्टिगाने पेनल्टी परिसरातून हा एकमेव निर्णायक गोल केला. दक्षिण अमेरिकेच्या या चॅम्पियनशिप स्पर्धेत मेक्सिकोच्या ट्रिने आपल्या आक्रमक चालीच्या जोरावर जमैकाला शेवटपर्यंत गोल करण्यापासून रोखले. ट्रिच्या दिलेल्या पासवर रोमोने चेंडूवर ताबा मिळवित तो आर्टिगाकडे पास दिला. या पासवर आर्टिगाने जमैकाचा गोलरक्षक वेटला हुलकावणी देत गोल नोंदविला. 25 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील आर्टिगाचा हा दुसरा गोल आहे. 50 व्या मिनिटाला जमैकाने मेक्सिकोच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली आणि त्यांच्या अँटोनियोने हेडरद्वारे मारलेला गोल पंचाने ऑफसाईड म्हणून नियमबाह्य ठरविला.

Advertisement

Advertisement
Tags :

.