मेक्सिकन फातिमा बॉश ‘मिस युनिव्हर्स-2025’
भारताच्या मनिका विश्वकर्माची केवळ ‘टॉप 30’ पर्यंत मजल
वृत्तसंस्था/ बँकॉक
मेक्सिकोच्या फातिमा बॉशने 2025 चा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. तिला मिस युनिव्हर्स 2024 व्हिक्टोरिया थेलविगने मुकुट घातला. भारताची मनिका विश्वकर्मा 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ‘टॉप 30’मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली पण ‘टॉप 12’ मध्ये पोहोचू शकली नाही. थायलंडची प्रवीणर सिंहने यात दुसरे स्थान पटकावले आहे. तर टॉप फाईव्ह स्पर्धकांमध्ये व्हेनेझुएलाची स्टेफनी अबासली, फिलिपाईन्सची अहतिसा मनालो आणि आयव्हरी कोस्टची ऑलिव्हिया यास यांचा समावेश आहे. 120 देशातील स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.
मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धा थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा मेक्सिकन मॉडेल फातिमा बॉशने ही स्पर्धा जिंकली. राजस्थानची रहिवासी असलेली भारताची मनिका विश्वकर्मा हिनेही जगभरातील सुंदरींसोबत या स्पर्धेत भाग घेतला. यावेळी तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, ती टॉप-10 मध्ये स्थान मिळवू शकली नाही.
ब्रयाच वादानंतर अखेर ‘मिस युनिव्हर्स 2025‘ या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. फिनाले जवळ आला असताना ही सौंदर्यस्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. फिनालेच्या तीन दिवस आधी दोन परीक्षकांनी राजीनामा देत ‘मिस युनिव्हर्स’च्या एकंदर कारभारावर जोरदार टिप्पणी केली होती. तसेच सर्वकाही आधीपासूनच ठरलेले होते, स्पर्धकाचे परीक्षकाशी अफेअर होते, असे धक्कादायक आरोप परीक्षक ओमर हरफॉच यांनी केले होते.
मेक्सिकोची फातिमा बॉश विजेती ठरली असली तरी ही सौंदर्यस्पर्धा या सर्व कारणांमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर होती. 4 नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेतून अनेक स्पर्धक बाहेर पडले होते. मिस युनिव्हर्स थायलंडच्या संचालक नवाट इत्साग्रिसिल यांनी फातिमा बॉशला ‘मूर्ख’ म्हटल्यानंतर फातिमासह अनेक स्पर्धक बाहेर पडले होते. हा वाद वाढताच नवाट यांनी माफी मागितली होती.