अनगोळ येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बेळगाव : अनगोळ ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने अनगोळ गावातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महालक्ष्मी मंदिर, गांधी स्मारक येथे हा सत्कार सोहळा पार पडला. दहावी-बारावी परीक्षेत अनगोळ गावातील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे गुण मिळवून अनगोळचे नाव जिल्ह्यासह राज्यात उज्ज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पदांवर कार्य करावे, अशा शुभेच्छा ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिल्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष जितेंद्र गुंडप्पन्नावर, राजशेखर भेंडीगेरी, अशोक भेंडीगेरी उपस्थित होते. बारावी परीक्षेत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या तन्वी पाटील, प्रगती शिंदोळकर, आदित्य डांगे व दहावी परीक्षेतील निधी कंग्राळकर, सान्वी पाटील, रंजन पाटील, निरंजन पाटील, बलराम सुळगेकर, अक्षरा कटगेन्नावर, श्रेया दोड्डगौडर, समर्थ दुर्गण्णावर, श्रेयस रेवणकर, अथर्व पाटील, आराध्या अक्की यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष पाटील, नागेश चिक्कमठ, प्रवीण खरडे, राहुल बांडगी, राजाराम बडमंजी आदी उपस्थित होते.