वेंगुर्ल्यात १५ जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
03:36 PM Jun 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
गौड सारस्वत ब्राह्मण समाज वेंगुर्लेचे आयोजन
Advertisement
वेंगुर्ले (वार्ताहर)-
गौड सारस्वत ब्राह्मण समाज,वेंगुर्लाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील समाजबांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दि. 15 जून रोजी स्वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे 10 वाजता संपन्न होणार आहे.या गुणगौरवास पात्र विद्यार्थ्यांनी किंवा त्यांचे पालकांनी, विद्यार्थ्याचे गुणपत्रकाचे झेरॉक्स प्रतीसह आपली नावे समाजाच्या अध्यक्ष सौ.सुजाता पडवळ - 9011188542 किंवा संजय पुनाळेकर फोन-9422434874 या नंबरवर वॅाटस्ॲपद्वारे पाठवून दि. 12 जून पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन गौड सारस्वत ब्राह्मण समाज, वेंगुर्लाच्या अध्यक्ष सौ.सुजाता पडवळ यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement