मेरे हसबंड की बिवी आज होणार प्रदर्शित
छावा, बेबीगर्ल आणि ड्रॅगर सोबत तगडी कॉम्पिटीशन
मुंबई
बहुप्रतिक्षित रोमॅंटीक, कॉमेडी चित्रपट मेरे हसबंड की बिवी हा आज ( दि. २१) रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच या मेरे हसबंड की बिवी आज प्रदर्शित झाला आहे. छावाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, मेरे हसबंड की बिवी चित्रपटाच्या निर्मात्यांसमोर आता फक्त माऊथ पब्लिसिटी वर अवलंबून रहावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
मेरे हसबण्ड की बिवी या चित्रपटाचे कॅची टायटल आणि स्टार कास्ट वर आधारित प्रेक्षकांनी पाठींबा दिला तर हा सिनेमा तग धरू शकेल. चित्रपटाची प्री रिलीज अॅडव्हन्स बुकींगमध्ये ५००० हुन कमी तिकीटे विकली गेली आहेत. त्यामुळे सिनेमाचे बॉक्स ऑफीसवरचे ओपनिंग स्लो असल्याचे दिसत आहे. आता हा सिनेमा वर्ड ऑफ माऊथ च्या आधारावरच काय जादू दाखवु शकतो हे पाहावे लागेल.