For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनमधील पुरुषांना मेकअपचे वेड

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
चीनमधील पुरुषांना मेकअपचे वेड
Advertisement

जगभरातील महिला स्वत:ला अधिक सुंदर दाखविण्यासाठी मेकअपसोबत प्लास्टिक सर्जरी करविण्यास हयगय करत नाहीत. परंतु एका देशात स्थिती अत्यंत बदललेली दिसून येत आहे. येथे पुरुषांदरम्यान मेकअपचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. या देशातील पुरुषांनी मेकअपप्रकरणी महिलांनाच मागे टाकले आहे. चीनमध्ये युवा पुरुष डेटिंगवर जाण्यापूर्वी आता मेकअप आणि मेकओव्हर करवून घेत आहेत. पुरुषांची युवा पिढी आता आपण कसे दिसतो या गोष्टीवर अधिक लक्ष देत आहे. याचमुळे डेटवर जाण्यापूर्वी पुरुष मेकओव्हर करवून घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये लूनर न्यू ईयरला ब्लाइंड डेट्ससाठी योग्य कालावधी मानण्यात येते. यादरम्यान पुरुषांना मेकअप सेवा देण्याचा प्रकार वाढला आहे. केवळ कन्स्टल्टेशन फीच 200 युआन म्हणजे 2300 रुपयांर्पंत वाढली आहे. हे प्रमाण कधीकाळी 60 युआन म्हणजेच सुमारे 691 रुपये होते, अशी माहिती सिचुआन प्रांतातील मेकअप आर्टिस्ट जियाओदान यांनी दिली.

Advertisement

आश्चर्याची बाब म्हणजे मेकअप सर्व्हिसची सर्वाधिक मागणी ग्रामीण भागांमधून होत आहे.  येथील घरातील वृद्ध लोक एकल पुरुषांसाठी एक दिवसात एकाहून अधिक ब्लाइंड डेटची व्यवस्था करत आहेत. फर्स्ट इम्प्रेशन महत्त्वाचे असल्याने बहुतांश पुरुष मेकअपला पसंती देत आहेत. लूनर न्यू ईयरच्या आठवडाभराच्या सुटींमध्ये पुरुषांचा मेकअप करण्यासाठी मोठी मागणी असल्याचे जियोओदान यांनी सांगितले आहे. पुरुष आता स्वत:चा रंग आणि आइबोवरून अधिक सजग होत आहेत. तर काही जण केसांची स्टाइल करवून घेत आहेत असे मेकअप आर्टिस्ट कोको यांनी सांगितले. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये चीनमध्ये 24 कोटी लोक सिंगल होते. 20-49 वयोगटातील सिंगल पुरुषांची संख्या समान वयोगटातील सिंगल महिलांच्या तुलनेत खूपच अधिक होती. चायना स्टॅटिस्टिक्स ईयरबुक 2022 नुसार त्या वर्षी विवाह करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत 6.83 दशलक्ष झाली, हे प्रमाण 2021 च्या तुलनेत 8 लाखाने कमी आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.