स्वत:च्या पसंतीची पत्नी खरेदी करतात पुरुष
भरतो वधूंचा बाजार, आईवडिलच लावतात बोली
तुम्ही कधी वधूंच्या बाजाराविषयी ऐकले आहे का? धान्य अन् भाज्यांची बाजारपेठ तुम्ही पाहिली असेल, परंतु वधूंचा बाजार कुठे भरतो हे माहित नसेल. बुल्गारियाचा ब्राइड मार्केट जगभरात प्रसिद्ध आहे. येथे लोक फिरून स्वत:च्या पसंतीच्या पत्नीचा शोध घेतात. बुल्गारियात स्तारा जागोर नावाचे एक ठिकाण आहे, जेथे वधूंची विक्री होते. या ठिकाणाला जिप्सी ब्राइड मार्केट या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी पुरुष स्वत:च्या परिवारासोबत येतात आणि स्वत:साठी पसंतीची मुलगी निवडतात. तेथे मुली मेकअप करून चमकणारे दागिने घालून येत असतात. पसंत पडलेल्या मुलीसोबत विवाह करण्यासाठी पुरुषाला तिच्या आईवडिलांसोबत मोलभाव करावा लागतो. मुलीच्या आईवडिलांचे समाधान झाले तर समोरच्या पुरुषाकडे मुलीला सोपवितात. हा मुलगा या मुलीला घरी घेऊन जातो आणि तिला स्वत:च्या पत्नीचा दर्जा देतो.
या बाजाराचे आयोजन कलैदजी समुदायाचे लोक करतात. यात समुदायाचे गरीब लोक स्वत:च्या मुलींना विकण्यासाठी येतात. सर्वसाधारणपणे विवाह सोहळ्यांकरता मोठा खर्च करतो. हा खर्च न परवडणारी कुटुंब येथे स्वत:च्या मुलीला आणत असतात. यानंतर स्वत:च्या सुनेसाठी मुलाचे कुटुंबीय येतात आणि पसंतीच्या मुलीची निवड करतात. मुलीच्या कुटुंबीयांना पैसे देऊन ते वधूच विकत घेतात. ही प्रथा बुल्गारियामध्ये शेकडो वर्षांपासून सुरू आहे. या बाजाराच्या आयोजनाला सरकारची अनुमती नसते. तरीही लोक मानत नाहीत.
बुल्गारियात वधूच्या बाजारात मुलींची किंमत विविध निकषांवर निश्चित केली जाते. तर घटस्फोटित आणि विधवा महिलांची कमी किमतीत विक्री केली जाते. या समुदायाच्या मुलींना कुठल्याही पुरुषाची भेट घेण्याची अनुमती नसते. पुरुषाची भेट घेण्यासाठी परिवाराचा होकार आवश्यक असतो. समुदायाच्या महिलांना डेट करण्याचीही अनुमती नाही. कलैदजी समुदायाचे लोक स्वत:च्या मुलींची विक्री स्वत:च्या समुदायाशी संबंधित लोकांनाच करत असतात. तसेच मुलीकडेच गरीब असणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत परिवार स्वत:च्या मुलीची विक्री करू शकत नाहीत. तर खरेदी करण्यात आलेल्या मुलीला सुनेचा दर्जा देणे आवश्यक आहे.