महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सफाई कर्मचारी संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

10:36 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेमध्ये 155 सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार नियुक्त करण्यात आले आहे. असे असताना त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी 1 ते 2 लाखांची मागणी केली जात आहे. त्याची संपूर्ण खातेनिहाय चौकशी करावी, 134 सफाई कर्मचाऱ्यांना देखील कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांचीही तातडीने नेमणूक करावी यासह इतर मागण्यांसाठी सफाई कर्मचारी कावल समितीच्यावतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना गैरप्रकार झाल्याची तक्रार यापूर्वीच झाली होती. त्यानंतर सरकारने नियमानुसार त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र त्यांना नियुक्तीपत्र देताना पैशाची मागणी केली जात आहे.

Advertisement

लोकायुक्तांनीही या प्रकरणी गांभीर्याने घेतले आहे. तसेच आता नगर विकास खात्याच्यावतीनेही चौकशी करावी. 253 क्वॉर्टर्स धारकांना अजूनही नोटीस देण्यात आली नाही. 393 मैलावाहू कुटुंबीयांना ओळखपत्र देण्यात यावीत. रमाबाई आंबेडकर समुदाय भवनामध्ये व्यायाम शाळा व ग्रंथालय सुरू करावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विजय निरगट्टी, दीपक वाघेला, षण्मुख आदीयांद्र, विठ्ठल तळवार, रामपाल दोरागडे, शिवमूर्ती सकट, सुभाष घराणी, संभाजी कोलकार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article