For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेहमुदुलचे नाबाद शतक, शदमन, मोमिनुलची अर्धशतके

04:02 AM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
मेहमुदुलचे नाबाद शतक  शदमन  मोमिनुलची अर्धशतके
Advertisement

आयर्लंडवर बांगलादेशची 52 धावांची आ

Advertisement

वृत्तसंस्था/ सिल्हेट, बांगलादेश

येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान बांगलादेशने आयर्लंडवर 52 धावांची आघाडी घेतली आहे. आयर्लंडने पहिल्या डावात 286 धावा जमविल्या. दुसऱ्या दिवशीअखेर बांगलादेशने पहिल्या डावात 1 बाद 338 धावा जमविल्या असून मेहमुदुल हसन जॉय 169 व मोमिनुल हक 80 धावांवर खेळत होते.

Advertisement

या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर कर्णधार अँडी बलबिर्नी शून्यावरच बाद झाला. त्यानंतर पॉल स्टर्लिंग व केड कार्मिकेल यांनी अर्धशतके नोंदवत दुसऱ्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी करून डाव सावरला. स्टर्लिंगला 60 धावांवर बाद करून नाहीद राणाने ही जोडी फोडली. स्टर्लिंगने 76 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार मारले. हॅरी टेक्टर एक धाव काढून बाद झाल्यानंतर कार्मिकेलला कर्टिस कॅम्फरकडून चांगली साथ मिळाली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. कार्मिकेल 59 धावा काढून बाद झाला. त्याने 129 चेंडूत 7 चौकार मारले.

कॅम्फर व लॉर्कन टकर यांनी आणखी एक 53 धावांची भागीदारी केली. कॅम्फरने 44 धावा काढताना 4 चौकार, 2 षटकार मारले. यावेळी आयर्लंडची स्थिती 5 बाद 203 अशी भक्कम होती. पण यानंतर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होते गेले आणि 92.2 षटकांत त्यांचा डाव 286 धावांत आटोपला. टकरने 41, जॉर्डनने 30, बॅरी मॅकार्थीने 31 धावा केल्या. बांगलादेशच्या मेहिदी हसन मिराझने 3, हसन मुराद, तैजुल इस्लाम, हसन मेहमुद यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.

बांगलादेशने पहिल्या डावात दमदार प्रारंभ केला. सलामीवीर मेहमुदुल सहन जॉय व शदमन इस्लाम यांनी 168 धावांची दीडशतकी भागीदारी केली. शदमन इस्लाम 80 धावांवर बाद झाला. त्याने 104 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार मारला. मेहमुदुलने मोमिनुल हकसमवेत भक्कम फलंदाजी पुढे चालू ठेवत दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 170 धावांची भागीदारी केली असून मेहमुदुल 169 व मोमिनुल 80 धावांवर दिवसअखेर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक : आयर्लंड प.डाव 286 : स्टर्लिंग 60, कार्मिकेल 59, कॅम्फर 44, टकर 41, नील 30, मॅकार्थी 31, मेहिदी हसन मिराझ 3-50, हसन मेहमुद 2-42, हसन मुराद 2-47. बांगलादेश प.डाव 85 षटकांत 1 बाद 338 : मेहमुदुल जॉय खेळत आहे 169, शदमन इस्लाम 80, मोमिनुल हक खेळत आहे 80, मॅथ्यू हम्फ्रेज 1-78.

घाडी

Advertisement
Tags :

.