महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मेहबुबा मुफ्ती यांचा अडवणुकीनंतर ठिय्या

06:26 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूंछला जाताना पोलिसांनी रोखले

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

पुंछमध्ये मारल्या गेलेल्या 3 नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पूंछच्या दिशेने जात असताना जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना पोलिसांनी अडवले. सुरक्षेच्या कारणास्तव डीकेजी रोडवर थांबवल्यानंतर त्यांनी तेथेच रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पीडीपीचे इतर नेतेही उपस्थित होते. आपली अडवणूक करून मुख्य घटनेतील तथ्य लपवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याच आरोप मुफ्ती यांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात चकमकीदरम्यान तीन नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक चौकशीअंती या नागरिकांच्या मृत्यूचा ठपका लष्करावर ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे सध्या राज्यात तणावाचे वातावरण असून मेहबुबा मुफ्ती शनिवारी या मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या. मात्र पोलिसांनी मेहबुबा मुफ्ती यांना सुरक्षेचे कारण सांगून तोपीर येथे जाऊ दिले नाही. त्यानंतर वाहनातून खाली उतरून त्यांनी जबरदस्तीने नाकाबंदी तोडून पायी चालत टोपीरकडे जाण्यास सुऊवात केली. यावेळी सुरक्षा दल आणि पोलिसांनी मेहबुबा मुफ्ती यांना पुढे जाण्यापासून रोखले असता त्यांनी तेथेच रस्त्यावर ठाण मांडले. इतर नेत्यांना पूंछमध्ये दिले जात असताना माझी अडवणूक का होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article