कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : साताऱ्याती 'त्या' कंपनीविरूद्धच्या आंदोलनाला नागरिकांचा वाढता पाठिंबा

04:20 PM May 06, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामांमध्ये दिरंगाई केल्यामुळे अनेक अपघात झालेत

Advertisement

सातारा : पंढरपूर रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम करत असताना प्राचीन वृक्षतोड करण्यात आली आहे. निविदामध्ये त्याजागी नवीन वृक्ष लागवड दिसून येत आहे. परंतु, प्रत्यक्षात वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामांमध्ये दिरंगाई केल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई न करता हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे मनुष्यवधाच गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी उपोषण सुरू केले आहे.

Advertisement

सध्या या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढून सुद्धा आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत, इतका संताप प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे. सबंधित कंपनीने निविदेनुसार कागदोपत्री दोन लाखाची वृक्ष लागवड करून रस्ते विकास नावाखाली ३० लाख रुपये बेकायदेशीर बचत केली आहे. एवढेच नव्हे तर एक गुन्हा पचला म्हणून दुसरा गुन्हा म्हणजे कंपनामार्फत काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे.

रस्त्याला काही महत्त्वाच्या गावच्या हद्दींमध्ये भेगा पडलेले बुजवण्याचं काम सध्या चालु आहे. हा पुरावा असून सुद्धा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व गुणवंत नियंत्रक आणि संबंधित यंत्रणा कारवाई करण्यापासून अलिप्त राहीले आहे. कंपनीने रस्त्याचे काम काम करताना कोणत्याही पद्धतीचे सेफ्टी रुल्स फॉलो केलेले नाही. या रस्त्यावर आजपर्यंत ६४ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही स्वरूपाची नुकसान भरपाई मिळालेली नाही.

यंत्रणेशी हात मिळवणी करून आज तारखे अखेर एकही सदोष मनुष्य वधाचा गुन्हा कंपनीवर दाखल झालेला नाही.त्यामुळे हा रस्ता म्हणजे मौत का कुवा बनला आहे. निरापराधी प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी आमचे आंदोलन असून जर भ्रष्ट अधिकाऱ्यांना ही बाब किरकोळ वाटत असेल तर कंपनी इतकाच आम्ही लोकवर्गणीतून निधी देऊन त्यांची पैशाची भूक भागवू.

आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायकवाड, अजय कदम, सलीम बागवान, राजेंद्र पोळ, नितीन राऊत, जमीर भोसले, उत्तम जाधव, किरण चव्हाण व सातारा, कोरेगाव, खटाव, माण तालुक्यातील चार चाकी दुचाकीवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले आहे.

मंगळवार दिनांक ६ मे पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे, युवा नेते जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष रमेश उबाळे व त्यांच्या समर्थकांनी तसेच प्रवाशांनी आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाला पहिल्या दिवशी ५० विविध संघटनेने पाठिंबा दिला आहे.

यापुढेही आंदोलन तीव्र करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत राज्याचे माजी मंत्री तसेच लोकप्रतिनिधींनीही संपर्क साधून पाठिंबा दर्शवला आहे.

Advertisement
Tags :
_satara_news#NATURE#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediasatara strike
Next Article