जुन्या बसस्थानकापर्यंत बस सोडण्यासंदर्भात आज बैठक
खानापूर : खानापूर येथील जुने बसस्थानक (राजा छत्रपती चौक) येथे खानापूर आगाराच्या बसेस पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात. तसेच आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी खानापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांची जाहीर बैठक आज मंगळवार दि. 1 रोजी सकाळी 11 वाजता येथील शिवस्मारक माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला आजी माजी आमदारांनी, आजी-माजी नगराध्यक्षानी, नगरसेवकानी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, व्यापाऱ्यांनी, संघ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहरातील ज्येष्ठ नागरिक प्रकाश देशपांडे, समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाणे, तालुका भाजपाचे संजय कुबल, प्रमोद कोचेरी, बाबुराव देसाई, पंडित ओगले, रवी काडगी, बाळाराम सावंत, गुंडू तोपिनकट्टी, शिवानंद सुळकर यांनी केले आहे.