महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाकीबाबांच्या जन्मभूमीत संमेलन, हीच खरी फलश्रुती

12:26 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 कवी प्रवीण दवणे यांचे उद्गार : शेकोटी संमेलनाची सांगता

Advertisement

फोंडा : कोकण मराठी परिषदेचे 18 वे शेकोटी साहित्य संमेलन कवीश्रेष्ठ बा. भ. बोरकर यांच्या जन्मभूमित होणे, हीच तर या संमेलनाची इतक्या वर्षांतील खरी फलश्रुती म्हणावी लागेल. ज्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या वातावरणात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला, तो बघितल्यावर आपण अंर्तबाह्या भारावून गेलो. ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ हा भेदभाव कुठेही दिसला नाही. साहित्य क्षेत्रातील प्रत्येक प्रतिभावंत आपले मी तूपण विसऊन संमेलनाच्या आनंद वातावरणात एकऊप झाले, असे चित्र अभावानेच बघायला मिळत असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक व गीतकार तसेच संमेलनाध्यक्ष प्रवीण दवणे यांनी समारोप सोहळ्यात व्यक्त केली.

Advertisement

बोरी येथील श्री नवदुर्गा मंदिरच्या सभामंडपात रविवारी सायंकाळी या शेकोटी संमेलनाची सांगता झाली. यावेळी व्यासपीठावर कोमपचे सल्लागार अॅङ रमाकांत खलप, डॉ. सोमनाथ कोमरपंत, कोमपचे अध्यक्ष सागर जावडेकर, सत्कारमूर्ती प्रा. नारायण महाले, डॉ. गीता गोविंद काळे, अजित नार्वेकर व चित्रा क्षिरसागर हे उपस्थित होते. सागर जावडेकर म्हणाले, गोव्यात मराठीचे अस्तित्त्व आजपर्यंत प्रभावी आणि परिणामकारक राहिले आहे. यापुढेही ते चिरंतन असेल. कोमपतफे साहित्याचा झरा सदैव प्रवाहित ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. गोमंतकीय मराठी साहित्यातील प्रतिभावंताना बरोबर घेऊन कोमप अधिक नेटाने कार्य करेल असे त्यांनी नमूद केले.

डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचा संस्थेला दिलेल्या विशेष योगदानाबद्दल प्रवीण दवणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. नारायण महाले व डॉ. गीता गोविंद काळे यांना देऊन सन्मानीत करण्यात आले. शास्त्रीय गायक रघुनाथ फडके, समाज कार्यकर्ते विश्वास प्रभूदेसाई, सुनील सावकार, संजय देसाई, राजू नाईक, मूर्तीकार बबन उर्फ संदीप च्यारी, अर्चक तसेच कलाकार अजित देवारी व बाबू उर्फ दत्तात्रय देवारी यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. दुर्गाकुमार नावती यांनीही सन्मानीत करण्यात आले. स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंगेश काळे यांनी केले. दुर्गाकुमार नावती यांनी सत्कारमूर्तींचा परिचय कऊन दिला. चित्रा क्षिरसागर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article