महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘थेट विधानसभा निवडणुकीत भेटा’

11:52 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाबूश मोन्सेरात यांचे उत्पल पर्रीकर यांना आव्हान

Advertisement

पणजी : पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल मनोहर पर्रीकर यांना 2027 च्या निवडणुकीत आपल्यासोबत दोन हात करण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे दोघांमध्ये वादावादी पुन्हा सुरू झाल्याचे समोर आले आहे. पर्रीकर यांनी पणजी स्मार्ट सिटीमधील विविध कामांबाबत आवाज उठविल्याबद्दल मोन्सेरात यांनी त्यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे सांगून त्यांना उत्तरे देण्यास आपण बांधील नाही. पणजीच्या जनतेला सर्व काही माहीत असून पर्रीकरांनी 2027 च्या निवडणुकीत भेटावे, असे सांगून मोन्सेरात यांनी उत्पल यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. पणजीतील विविध स्मार्ट कामे 31 मे पर्यंत पूर्ण होतील, अशी ग्वाही मोन्सेरात यांनी दिली आहे. त्या कामांची दैनंदिन पद्धतीने देखरेख करण्यात येणार असून लोकांनी संयम पाळावा असे आवाहनही मोन्सेरात यांनी केले आहे. स्मार्ट सिटीसाठी जे सल्लागार कंत्राटदार नेमण्यात आले आहेत ते ‘कमिशन एजन्सी’ असल्याचा दावा मोन्सेरात यांनी केला आहे. स्मार्ट सिटी कामांची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पणजीच्या स्मार्ट सिटी कामाबाबत उगाच आलतू फालतू प्रश्नांना उत्तरे देत आपण बसणार नाही. कोणी प्रश्न करू नयेत असे मोन्सेरात यांनी नमूद केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article