For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मीनाक्षी शेषाद्री करणार पुनरागमन

06:28 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
मीनाक्षी शेषाद्री करणार पुनरागमन
Advertisement

अल्लू अर्जुनच्या चित्रपटात दिसणार

Advertisement

80 आणि 90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर स्वत:ची जादू दाखवून दिली होती. त्यातील काही जणी आजही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. तर काहींनी अंतर राखले आहे. माधुरी दीक्षित, श्रीदेवी यासारख्या अभिनेत्रींना प्रचंड मागणी असताना मीनाक्षी शेषाद्रीने देखील लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. परंतु विवाहानंतर तिने बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले होते.

मीनाक्षी शेषाद्री ही 90 च्या दशकातील प्रख्यात अभिनेत्री राहिली आहे. तिने अनिल कपूर, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, राजेश खन्ना यासारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले होते. मीनाक्षी यांना त्यांच्या नृत्यकौशल्यासाठी देखील ओळखले जाते. त्यांनी भरतनाट्याम, कथ्यक आणि ओडिसीचे प्रशिक्षण घेतले आहे. मीनाक्षी शेषाद्री आता चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. लवकरच त्या अल्लू अर्जुनच्या चित्रपटात दिसून येणार असल्याचे समजते. मीनाक्षी शेषाद्री यांना दामिनी, शेहंशाह, आदमी खिलौना है, युगल यासारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखले जाते.

Advertisement

Advertisement
Tags :

.