कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मीनाक्षी, काजोल, साक्षी यांना सुवर्ण

06:44 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / जयपूर

Advertisement

येथे सुरू झालेल्या 2025 च्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत गुरूनानक देव विद्यापीठाची महिला सायकलपटू मीनाक्षी रोहिलाने मंगळवारी पहिले सुवर्णपदक सायकलिंगमध्ये पटकाविले. महिलांच्या वैयक्तिक टाईम ट्रायल प्रकारात तिने हे सुवर्णपदक घेतले आहे. साक्षी पाडेकरने नेमबाजीत तर शिवाजी विद्यापीठाच्या काजोल सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकाविले.

Advertisement

त्याचप्रमाणे या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या काजोल सरगरने महिलांच्या 48 किलो वजन गटातील वेटलिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या साक्षी पाडेकरने सुवर्णपदक घेतले. खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच सायकलिंग क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. 2022 च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सायकलिंगच्या सांघिक पर्सुएट प्रकारात कांस्यपदक मिळविणाऱ्या मिनाक्षी रोहीलाने जयपूरमधील स्पर्धेत महिलांच्या 30 कि.मी. पल्ल्याच्या वैयक्तिक टाईम ट्रायल सायकलिंग प्रकारात सरासरी ताशी 39.5 कि.मी.चा वेग राखत 00:45:31.907 असा कालावधी घेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या क्रीडा प्रकारात जयपूरच्या महाराजा गंगासिंग विद्यापीठाची पूजा बिस्नॉईने रौप्य पदक मिळविताना 00:46:52.003 कालावधी नोंदविला तर पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अपूर्वा गोरेने 00:47:24.933 कालावधी घेत कांस्यपदक घेतले. महाराजा गंगासिंग विद्यापीठाच्या मानव सारडाने पुरूषांच्या 40 कि.मी. पल्ल्याच्या वैयक्तिक टाईम ट्रायल सायकलिंग प्रकारात पहिले सुवर्ण पदक पटकाविताना 00:52:12.947 कालावधीची नोंद केली. या क्रीडा प्रकारात पंजाब विद्यापीठाच्या जय डोग्राने रौप्य पदक तर लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या गौरांग सिंग गौरने कांस्यपदक पटकाविले.

महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात साक्षी पाडेकरने 253.2 गुण नोंदवित सुवर्ण तर पंजाब विद्यापीठाच्या दिशा धनकरने 252 गुण नोंदवित रौप्य आणि मद्रास विद्यापीठाच्या नर्मदा नितीनने 230.5 गुण नोंदवित कांस्यपदक मिळविले.महिलांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजी प्रकारात साक्षी पाडेकर, प्रियांका दास आणि संजिता दास यांनी लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून देताना एकूण 1884 गुण नोंदविले.

वेटलिफ्टिंग या प्रकारात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची काजोल सरगरने महिलांच्या 48 किलो वजन गटात एकूण 158 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले. सांगलीच्या 19 वर्षीय काजोलने स्नॅचमध्ये 73 किलो वजन उचलले. त्यानंतर क्लिन आणि जर्कमध्ये तिने 85 किलो वजन उचलत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. बेहरामपूर विद्यापीठाच्या रिंकी नायकने या क्रीडा प्रकारात एकूण 149 किलो वजन उचलत रौप्य तर राणीने 148 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article