स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत मिनाक्षी अळवणी प्रथम
अक्षय कानविंदे तर प्राजक्ता वेंगुर्लेकर तृतीय
ओटवणे प्रतिनिधी
ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व कोकणभूषण स्वर्गीय विद्याधर भागवत यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य रविवारी आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या कै विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत बांदा येथील मिनाक्षी अळवणी हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सावंतवाडी येथील अक्षय कानविंदे याने द्वितीय क्रमांक तर वेंगुर्ला येथील प्राजक्ता संकेत वेंगुर्लेकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी योगिता शेटकर (सावंतवाडी) आणि माया पा गवस (झोळंबे) यांची निवड करण्यात आली.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए बुवा, उपाध्यक्ष उषा परब, सचिव प्रा. सुरेश मुकंण्णावर, कोषाध्यक्ष भरत गावडे, प्रमुख पाहुणे कवी अरुण नाईक, परीक्षक सौ. स्नेहा फणसळकर, किशोर वालावलकर, विठ्ठल कदम, श्रीया भागवत, प्रा. सुषमा मांजरेकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, अँड नकुल पार्सेकर, मनोहर परव, कृष्णा गावडे, विजय गावडे, संगिता सोनटक्के, दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, बाळकृष्ण राणे, सुर्यकांत सांगेलकर आदी उपस्थित होते.स्पर्धेच्या पारितोषिक वितरण वितरणात प्रथम तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक तर स्पर्धेतील सहभागी असणाऱ्या प्रत्येक कवीला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कविता आरती मासिकातून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषा परब यानी, सुत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर यांनी तर आभार भरत गावडे यांनी मानले.