कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मेदव्हेदेव, अल्कारेझ, स्वायटेक उपांत्य फेरीत

06:55 AM Mar 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेल्टन, स्वीटोलिना, सॅमसोनोव्हा, बेनसिक पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था / कॅलिफोर्निया

Advertisement

इंडियन वेल्स मास्टर्स बीएनपी पेरीबस 1000 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या  आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा मेदव्हेदेव, स्पेनचा अल्कारेझ, ब्रिटनचा ड्रेपर, महिलांच्या विभागात पोलंडची स्वायटेक, रशियाची अँड्रीव्हा, अमेरिकेची मॅडीसन कीज आणि साबालेंका यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली. अमेरिकेचा बेन शेल्टन, सॅम सोनोव्हा, स्वीटोलिना आणि बेनसिक यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने फ्रान्सच्या आर्थर फिल्सचा 6-4, 2-6, 7-6 (7-5) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने फ्रान्सीस्को सेरुनडोलोचा 6-3, 7-6 (7-4) अशा सरळ सेट्मध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अल्कारेझ आणि ब्रिटनचा ड्रेपर यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या बेन शेल्टनचे आव्हान 6-4, 7-5 अशा सेट्मध्ये संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. डेन्मार्कच्या होल्गेर रुनेने हॉलंडच्या ग्रिकस्पूरचा 5-7, 6-0, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंडच्या टॉपसिडेड इगा स्वायटेकने चीनच्या आठव्या मानांकित झेंग क्वीनवेनवर 6-3, 6-3 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. स्वायटेकने यापूर्वी दोनवेळा इंडियन वेल्स स्पर्धा जिंकली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्वीनवेनने स्वायटेकचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले होते. या पराभवाची परतफेड स्वायटेकने इंडियन वेल्स स्पर्धेत केली.

महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात रशियाच्या नवोदित मीरा अँड्रीव्हाने युक्रेनच्या इलिना स्वीटोलिनाला 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. रशियाच्या 19 वर्षीय अँड्रीव्हाने गेल्या महिन्यात डब्ल्युटीए टूरवरील 1000 दर्जाची दुबईतील टेनिस स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत 2005 साली रशियाच्या मारिया शरापोव्हाने उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी अँड्रीव्हा ही रशियाची पहिली टेनिसपटू आहे. अँड्रीव्हा आणि स्वायटेक यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. टॉपसिडेड साबालेंकाने लुडमीला सॅमसोनोव्हाचा 6-2, 6-3 असा फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या पाचव्या मानांकित आणि ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम विजेत्या मॅडीसन किजने स्वीसच्या वाईल्ड कार्डधारक बेलिंडा बेनसिकचा 6-1, 6-1 अशा फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. साबालेंका आणि मॅडीसन कीज यांच्यात उपांत्य फेरीत गाठ पडेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article