महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मेदवेदेव्ह , अल्कारेझ, रायबाकिना, क्रेसिकोव्हा उपांत्य फेरीत

06:42 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जोकोविचचीही आगेकूच, सिनेरला पराभवाचा धक्का, टॉमी पॉल, ओस्टापेन्को, स्विटोलिना यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, डॅनिल मेदवेदेव्ह, महिला एकेरीत रायबाकिना व क्रेसिकोव्हा यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली तर टॉमी पॉल, यानिस सिनेर, अॅलेक्स डी मिनॉर, एलेना ओस्टापेन्को व स्विटोलिना यांचे आव्हान संपुष्टात आले.

जोकोविचला उपांत्य फेरी गाठण्यासाठी कष्ट घ्यावे लागले नाहीत. पार्श्वभागाला झालेल्या दुखापतीमुळे अॅलेक्स डी मिनॉरने माघार घेतल्याने त्याला पुढे चाल मिळाली. नववे मानांकन मिळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या डी मिनॉरने सांगितले की, सोमवारी झालेल्या चौथ्या फेरीच्या सामन्याच्या अखेरीस क्रॅकचा आवाज ऐकू आला होता. तो सामना डी मिनॉरने 6-2, 6-4, 4-6, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे त्याने मीडियाशी बोलताना सांगितले. विम्बल्डनमध्ये त्याने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. गेल्या महिन्यात त्याने फ्रेंच ओपनमध्येही उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. जोकोविचने 13 व्या वेळी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून फेडररच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. त्याने आतापर्यंत विक्रमी 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्यातील सात विम्बल्डन अजिंक्यपदे आहेत. त्याची उपांत्य लढत टेलर फ्रिट्झ किंवा लॉरेन्झो मुसेटी यापैकी एकाशी होईल.

विद्यमाना विजेता कार्लोस अल्कारेझने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 5-7, 6-4, 6-2, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. त्याची पुढील लढत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हशी होईल. गेल्या वर्षीही या दोघांची उपांत्य फेरीत गाठ पडली होती आणि त्यावेळी अल्कारेझने विजय मिळवित नंतर जेतेपदही पटकावले होते. पहिल्या सेटमध्ये अल्कारेझला झगडावे लागल्याने तो गमवावा लागला. दुसऱ्या सेटनंतर नियंत्रण मिळवित अल्कारेझने तिन्ही सेट जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

अग्रमानांकित सिनेरला धक्का

जागतिक अग्रमानांकित इटलीच्या यानिक सिनेरला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने त्याचे जेतेपदाची स्वप्न भंगले. रशियन स्टार मेदवेदेव्हने रोमांचक लढतीत सिनेरचा 6-7 (7-9), 6-4, 7-6 (7-4), 2-6, 6-3 असा पराभव करून शेवटच्या चारमध्ये प्रवेश मिळविला. सिनेरने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकला. दुसरा व तिसरा सेट मेदवेदेव्हने जिंकत आघाडी घेतली होती. पण सिनेरने टायब्रेकरपर्यंत लांबलेला चौथा सेट जिंकून बरोबरी साधली होती. पण निर्णायक सेटमध्ये मेदवेदेव्हने समतोल राखत सेटसह सामना जिंकला. आधीच्या फेरीत सिनेरने चौदाव्या मानांकित बेन शेल्टनवर संघर्षपूर्ण विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

ओस्टापेन्को, स्विटोलिना पराभूत

महिला एकेरीत चौथ्या मानांकित इलेना रायबाकिना व बार्बोरा क्रेसिकोव्हा यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविला. रायबाकिनाने 21 व्या मानांकित एलेना स्विटोलिनाचा 6-3, 6-2 असा पराभव केला तर 31 व्या मानांकित क्रेसिकोव्हाने 13 व्या मानांकित ओस्टापेन्कोवर 6-4, 7-6 (7-4) अशी मात करून आगेकूच

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article