महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये माफक शुल्कात वैद्यकीय सेवा

11:36 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू केलेल्या होमिओपॅथिक, डेंटल विभागाचे उद्घाटन शुक्रवारी खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. केएलई होमिओपॅथिक कॉलेज, मराठा मंडळ डेंटल कॉलेजतर्फे दोन वैद्यकीय विभाग सुरू केले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने या सेवा अत्यंत माफक शुल्कात देण्याचा विचार बोर्ड मिटिंगमध्ये केला होता. त्यानुसार मराठा मंडळ डेंटल कॉलेजच्या सहकार्यातून स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. तसेच होमिओपॅथिक उपचारासाठी केंद्र सुरू केले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बाहेरील नागरिकांनाही याचा लाभ मिळणार आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सर्वसामान्यांना माफक शुल्कात वैद्यकीय सेवा मिळाव्यात, यासाठी मदत करू, असे आश्वासन दिले. सीईओ राजीव कुमार यांनी स्वागत केले. यावेळी कॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर, केएलई होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. यु. ए. उडचणकर, मराठा मंडळचे डॉ. आनंद हिरेमठ, डॉ. सचिन शिवनाईक, डॉ. जरीर रुस्तमजी, डॉ. श्रीकांत पुजारीसह कॅन्टोन्मेंटचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article