For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉक्टरी जिहाद !

06:01 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
डॉक्टरी जिहाद
Advertisement

दहशतवादाला जात-धर्म काही नसतो. तर देवानंतर आपण कोणाला मानतो तर तो जीव वाचविणाऱ्या डॉक्टरांना. मात्र हेच डॉक्टर जिवावर उठले तर यांच्यावर कोणाचा विश्वास देखील राहणार नाही. अशाच प्रकारे दिल्लीत बॉम्बस्फोट घडविल्यानंतर संपूर्ण देशात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या जिहादी डॉक्टरांचा तपास यंत्रणांनी भांडाफोड केला.

Advertisement

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर एका कारमध्ये महाभयंकर स्फोट झाला. त्यात चालकासह आजूबाजूचे 13 जण ठार झाले, तर 20 जण गंभीर जखमी झाले. आजतागायत मृत्यूच्या आकड्यात वाढ होऊन तो 17 च्या वर गेला आहे. तर काही वेळात हा दहशतवादी हल्ला असल्याचे उघड झाले. सोबत केंद्राने विविध शहरांमधील सुरक्षाव्यवस्था केली. काश्मीरमधील पुलवामा येथे राहणारा डॉ. उमर उन नबी याने आय 20 ही कार चालवत किल्ला परिसरात आत्मघाती हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. त्यात तोही ठार झाला. या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहा अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक स्थापन करीत यामध्ये जवळपास एक डझनहून डॉक्टरांना अटक केली. आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या बॉम्बस्फोटाप्रकरणी डॉक्टरांना अटक करण्याची ही प]िहलीच वेळ असल्याने, हा डॉक्टरी जिहाद तर नाही ना अशी चर्चा सुऊ झाली आहे.

आमने-सामनेच्या लढाईत आपण चारी मुंड्या चित झालो आहे. ऑपरेशन सिंदुरने देशाचा बुरखा आंतरराष्ट्रीय स्तरावर फाडला आहे. ही सल पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या मनात खदखदत होती. याचाच बदला घेण्यासाठी देशात आयएसआयचे स्लिपर सेल म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर फळीला दहशतवाद्यांनी सक्रीय केले. त्यानुसार, जवळपास 3 हजार किलो स्फोटके आणि शस्त्रs देशातील विविध कानाकोपऱ्यात पोहचविली. तसेच हा हल्ला यापूर्वी इंडियन मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मद या संघटनांची मोड्स ऑपरेंडी सारखा असावा अशी योजना तयार केली. मात्र यामध्ये आयएसआयने पुन्हा एकदा भारतीय तपास यंत्रणांना कमी लेखण्याची चुक केली आणि त्यांचा भांडाफोड झाला. एवढेच नाही तर या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेक डॉक्टर तसेच महिला डॉक्टरला अटक करण्यात आली. एवढेच नाही तर बॉम्बस्फोटात वापरलेल्या चारचाकी गाडीवऊन देखील तपास यंत्रणांनी सुतावऊन स्वर्ग गाठला. देशात आत्तापर्यंत 3 हजार किलो स्फोटके जरी जप्त केली असली तरी अद्यापही काही किलो स्फोटके ही देशातील स्लिपर सेलकडे पोहचली असून, त्यांचा युद्धपातळीवर तपास सुऊ आहे. दरम्यान चारचाकी वाहनाच्या एका लिंकवऊन या बॉम्बस्फोटांतील सहभागी जिहादी डॉक्टरापर्यंत तपास यंत्रणांना पोहचता आले.

Advertisement

या प्रकरणात पेंद्रीय तपास संस्था कारचा मूळ मालक गुऊग्रामच्या मोहम्मद सलमानची चौकशी करत आहेत. सलमानने कार ओखला येथील व्यक्तीला विकली होती. त्या व्यक्तीने नंतर अंबाल्यातील एकाला गाडी विकली. त्यानंतर ही कार पुलवामातील एकाला विकली. येथूनच जिहादी डॉक्टर अडकले गेले. विशेष म्हणजे या आधी अहमदाबादमध्ये 26 जुलै 2008 रोजी कार बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी अनेक कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. याचा तपास मुंबई गुन्हे शाखेने कार चोराच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून केला होता.

अहमदाबाद बॉम्बस्फोटात वापरल्या गेलेल्या काही वाहनांची चोरी नवी मुंबईतील पनवेलमधून केल्याची मुंबई गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. स्फोटांमध्ये वाहनाचा केवळ सांगाडा उरला होता. तरीही चेसिस नंबरवरून ती नवी मुंबईतील गाडी असल्याचे लक्षात आले. तपास अधिकाऱ्यांनी आरटीओकडून वाहनमालकांची नावे आणि पत्ते मिळवले. त्यांच्या चौकशीनंतर ही वाहने स्फोटांच्या चार दिवस आधी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. कारचोर एकाच वेळी रस्त्याने इतके लांब अंतर प्रवास करू शकत नव्हते, हे तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. ते वाटेत हॉटेलमध्ये राहिले असावेत. मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक अऊण चव्हाण आणि निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी नवी मुंबई ते अहमदाबाद आणि सुरत या मार्गावरील प्रत्येक हॉटेलचे रजिस्टर तपासले. एका रजिस्टरमध्ये मूळ वाहन क्रमांक लिहिलेला आढळला.  तथापि, आरोपीने नंतर वाहनाचा मूळ क्रमांक बदलला होता. हॉटेलमध्ये मूळ वाहन क्रमांक लिहिताना, कारचोर अफजल उस्मानीने त्याचा मोबाईल नंबर चुकीचा लिहिला होता. तथापि, त्याने फोटो आयडी म्हणून दिलेल्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये त्याचा जुना पत्ता होता आणि तेथून तपास अधिकाऱ्यांनी त्याचा नवीन मोबाईल नंबर मिळवला.

या नंबरचा मागोवा घेतल्याने अनेक आरोपींना अटक करण्यात आली. यात दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये लपलेल्या मोहम्मद सादिक शेख यांचा समावेश होता. बाटला हाऊस एन्काउंटरच्या दिवशी, मुंबई गुन्हे शाखेचे चार अधिकारी अजय सावंत, अजय जोशी, शशांक सांडभोर आणि मदने बाटला हाऊसच्या बाहेर उभे होते. बाटला हाऊस एन्काउंटरमध्ये दिल्ली पोलिसांचे अधिकारी मोहन चंद्र शर्मा शहीद झाले होते. दिल्लीत झालेला स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याने महत्त्वाचे म्हणजे, मुंबईत अटक झालेला आणि 2008 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या कारबॉम्बस्फोटांशी जोडलेला मोहम्मद सादिक शेख देखील आत्मघातकी हल्लेखोर होता. अमेरिकेतील 9/11 नंतर, कोलकातामधील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर एके 47 ने गोळीबार करण्यात आला. त्या गोळीबारात मोहम्मद सादिक सहभागी होता. मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत सादिकने याची कबुली दिली. गुजरात बॉम्बस्फोटाच्या दोन महिने आधी, 13 जुलै 2008 रोजी दिल्लीत अनेक बॉम्बस्फोट झाले. त्या काळात, इंडियन मुजाहिद्दीन देशात कोणत्याही बॉम्बस्फोटाच्या 5 मिनिटे आधी मुंबईतून ईमेल पाठवत असे, ज्यामध्ये ‘शक्य असेल तर थांबवा’ असा संदेश होता. 2008 च्या दिल्ली बॉम्बस्फोटांपूर्वी, चेंबूरमधील एका इमारतीतील एका घराचे वायफाय कनेक्शन हॅक करून ईमेल पाठवण्यात आला होता.

कारचोर अफजल उस्मानीच्या मोबाईल डेटामध्ये मोहम्मद सादिकचा मुंबईतील मोबाईल नंबर सापडला तेव्हा मुंबई पोलिसांनी मोहम्मद सादिकच्या मोबाइल फोनचा सीडीआर मिळवला. तपास यंत्रणांना सॉफ्टवेअर इंजिनिअर मन्सूर पीरबॉयचा पुणे मोबाइल नंबर सापडला, जो दिल्ली आणि गुजरातसह देशभरातील विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांबद्दल ईमेल पाठवण्यासाठी मुंबईत येत असे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अल कायदाशी संबंध असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जुबेर हंगेरगेकरला पुण्यातून अटक केली. विशेष म्हणजे 2008 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोटात आठ दहशतवाद्यांनी दिल्लीहून अहमदाबादला जाण्याची तत्काळ तिकिटे जागीच बुक केली होती. गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर ते त्याच दिवशी अहमदाबादहून ट्रेनने दिल्लीला परतले. नंतर, त्यापैकी काही दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये राहिले, तर काही मुंबई आणि पुण्यात गेले.

दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी डॉ. शाहीन हीला अटक केली आहे. ती लखनऊची असून ती फरिदाबादच्या अल फतह या विद्यापीठाशी संबंधित आहे. या विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या या महिलेचे वागणे फारच संशयास्पद होते. दिल्लीच्या बॉम्बस्फोटात जी कार वापरली गेली, ती कार डॉ. शाहीनच्या कॉलेजजवळ दहा दिवस उभी होती. शाहीनला पकडण्यात आल्यानंतर तिच्याजवळ रायफल, पिस्तूल आदी शस्त्रसाठाही आढळून आला. दिल्लीतील बॉम्बस्फोटातील तीही एक सूत्रधार असल्याचे समोर आले.

एवढेच नाही तर मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड पाकिस्तानच्या हाफिज सईदची बहीण सादिया अझहर ही डॉ. शाहीनच्या संपर्कात होती. डॉ. शाहीन स्त्रियांच्या दहशतवादी संघटनेत सामील झाली होती. ती मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट घडविण्यासाठी उच्चशिक्षित डॉक्टरांना प्रेरित करीत होती. त्यानुसार तिने 6 डिसेंबरपूर्वी (बाबरीच्या पतनाचा दिवस) देशात सर्व ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट देखील आखला. मात्र  जम्मू-काश्मीरचे डॉ. जी. व्ही. के. सुंदर संदीप चक्रवर्ती हे तेलुगू आयपीएस अधिकारी काश्मीरमध्ये तैनात आहेत. सूड घेण्यासाठी लागलेले पोस्टर पाहून ते सजग झाले. ज्यांनी पोस्टर लावले होते, त्यांना चक्रवर्ती यांनी अटक केली असता अतिरेकी डॉक्टरांचे एक ‘जिहादी मॉड्यूल’ उघडकीस आले व एकाच वेळी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट्टरपंथीय डॉक्टरांचा जो कट होता, तो उधळला गेला.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.