For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव (वित्त) वर्षाची अर्थगुढी

06:30 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
नव  वित्त  वर्षाची अर्थगुढी
Advertisement

(उत्तरार्ध)

Advertisement

गुंतवणुकीबाबत नेहमी जोखीम समजून घेणे व जोखीम व्यवस्थापन करणे हेही फार महत्त्वाचे असते. जोखीममुक्त अशी कोणतीही गुंतवणूक असत नाही. त्यामुळे खात्रीपूर्वक उच्च परतावा देणाऱ्या सर्व योजना या फसव्या असतात हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. आपण किती जोखीम घ्यायला तयार आहोत यावरूनच गुंतवणूक साधन निवडावे. साधारणपणे आपले वय 100मधून वजा केले तर येणारा अंक जोखीम किती प्रमाणात घ्यावी हे स्पष्ट करतो. उदा. 25 वर्षाच्या युवकाने 75 टक्के उत्पन्न जोखीम असणाऱ्या साधनात तर 60 वर्षाच्या व्यक्तीने 40 टक्के उत्पन्न जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीत करणे योग्य ठरते. अर्थात हा ढोबळ नियम असून व्यक्तिगत आवड, जबाबदारी प्रमाण यावरही जोखीम प्रमाण ठरते.

गुंतवणूक योग्य प्रकारे करणे हे आपल्या पैशाला कामाला लावणे, गतिमान करण्याचे सूत्र आहे. त्यासाठी रक्कम कमी असली तरी दीर्घ कालखंडात चक्रवाढ पद्धतीने त्यात मोठी वाढ होते. त्यामुळेच चक्रवाढ तत्वास आईन्स्टाईन यानी आठवे आश्चर्य मानले आहे. आपणही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टासाठी अल्पकालीन गुंतवणूक साधन निवडले तर नुकसान होते. पेन्शनसाठीची गुंतवणूक बचत खात्यात ठेवणे हे शहाणपणाचे ठरत नाही. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासास आपण  वेगवान वाहन निवडतो तसेच गुंतवणुकीबाबतही ठरते. परंतु मुळातच ध्येय केंद्रित किंवा उद्दिष्ट निश्चित गुंतवणूक करणारेच फार कमी असल्याने त्यांचे नुकसान मोठे झालेले असते.

Advertisement

गुंतवणूक संवाद हा अलीकडच्या काळातील महत्त्वाचा घटक बनत असून आपल्या पश्चात वारस नोंद करणे, सर्व गुंतवणुकीच्या नोंदी ठेवणे, घरातील जबाबदार व्यक्तीस त्याची पूर्ण कल्पना देणे याबाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सध्या विविध वित्तसंस्थांकडे 86000 कोटी रुपये बेवारस पडून आहेत ते यामुळेच! निदान आपली गुंतवणूक त्यामध्ये जाणार नाही, याची काळजी घेणे उचित ठरेल. गुंतवणूक संवादाचा दुसरा भाग हा गुंतवणुकीचे दर सहा महिन्याने अथवा वर्षातून एकदा पुनरावलोकन करणे व गरजेनुसार गुंतवणूक रचना (पोर्टफोलियो) बदलणे आवश्यक असते. विशेषत: शेअर्स, म्युच्युअल फंड याबाबत हे अधिक खरे आहे.

गुंतवणुकीचे बदलते क्षितीज

गुंतवणूक साधने वास्तव व वित्तीय अशा दोन प्रमुख गटात विभागल्या जातात.  फ्लॅट, जमीन, घरे, सोने ही सर्व वास्तव गुंतवणुकीचे प्रकार असून मुदत बंद ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स या वित्तीय गुंतवणुकी आहेत. अद्यापी वित्तीय गुंतवणुकीचे प्रमाण अल्प असून गुंतवणुकीचे बदलते क्षितिज किंवा नव्या संधी लक्षात घेणे आवश्यक आहे. शेअर बाजार व म्युच्युअल फंडातील परतावा दीर्घ कालखंडाच्या निकषावर 15 ते 16 टक्के इतका उत्तम असूनही फक्त 7 टक्के भारतीय याचा वापर  करतात. शेअर बाजार, जुगार समजणारे व त्याकडे दुर्लक्ष करणारे खरे नुकसान प्राप्त करणारे ठरतात. सध्या हा कल बदलत असून म्युच्युअल फंडातून दरमहा 18000 कोटीची गुंतवणूक होत असून हा सकारात्मक बदल भांडवल बाजार स्थिर करण्यास मदतकारक ठरतो आहे.

वित्तीय बाजारात सुरक्षितता व पारदर्शी व्यवहार महत्त्वाचे असून त्यासाठी देशाच्या पातळीवर सेबी  एाम्ल्rग्tगे aह् xिंम्प्aहा ँद् द घ्ह्ग्a  म्हणजे भारतीय प्रतिभूमी आणि विनिमय मंडळ कार्यरत असून गुंतवणूकदारांना साक्षर करणे, त्यांचे संरक्षण करणे व सुलभता वाढवणे यासाठी प्रयत्नशील आहे. आर्थिक सल्लागार प्रशिक्षित असावेत. यासाठी नियम तयार केले असून नोंदणीकृत नसणारे वित्त सल्लागार दंडनीय आहेत. जर गुंतवणुकदाराची फसवणूक झाली तर तक्रार निवारण्यासाठी स्कोअर (एम्दा) प्रणाली उपलब्ध असून त्याचा आपण वापर करू शकतो.केवळ पैसे मिळवून चालणार नाही तर मिळवलेला पैसा सांभाळणे, वाढवणे महत्त्वाचे असून त्यासाठी नव्या तंत्राचा, साधनाचा वापर करून समृद्धीची, स्थैर्याची अर्थगुढी या नव्या वित्तवर्षात उभी करू व आपण त्याच्यावर लक्ष ठेवू!

- प्रा. विजय ककडे

Advertisement
Tags :

.