For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदाशिवगड जय दुर्गामाता सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना ताब्यात

12:44 PM Oct 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
सदाशिवगड जय दुर्गामाता सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना ताब्यात
Advertisement

अधिक परताव्याचे आमिष दाखवून सुमारे 54 कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या

Advertisement

कारवार : येथून जवळच्या सदाशिवगड येथील जय दुर्गामाता सौहार्द सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक लिंगराज पुत्तू कळगुटकर यांना ताब्यात घेण्यात सीओडीला यश आल्याची माहिती सदाशिवगड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गजेंद्र नाईक यांनी दिली. ते येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलत होते, जय दुर्गामाता सौहार्द सोसायटीचे मुख्यालय सदाशिवगड येथे असून, या सोसायटीच्या शाखा अन्यत्रही कार्यरत आहेत. अधिक परताव्याचे आमिष दाखवून लिंगराज यांनी  गरीब आणि मागासवर्गीय शेकडो ठेवीदारांकडून सुमारे 54 कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. तथापि जेव्हा सोसायटीकडून ठेवींची रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली.

तेव्हा सोसायटीचे आणि व्यवस्थापकीय संचालक लिंगराज कळगुटकर यांचे खरे रुप समोर आले. जेव्हा ठेवीदारांनी आपली रक्कम परत करण्याचा तगादा लावला. तेव्हा ते फरार झाले होते. गेल्या अडीच-तीन पहिन्यापासून कळगुटकर फरार झाले होते. त्यानंतर आर्थिक फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी कळगुटकर याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली होती. संबंधितांकडे विनंती अर्ज, निवेदने देऊन थकलेल्या ठेवीदारांना आता आशेचा किरण दिसू लागला आहे. कारण या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीओडीने कळगुटकर याला ताब्यात घेऊन ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी उपाय हाती घेण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.

Advertisement

कळगुटकर यांच्या मालमत्तेचा तपशील गोळा करण्यास प्रारंभ

डॉ. गजेंद्र नाईक पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांनी कळगुटकर यांच्या मालमत्तेचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ठेवीदारांच्या बैठकीत त्यांची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले आहे. ठेवीदारांनी आपल्या ठेवींचा आणि अन्य माहितीचा तपशील सदाशिवगड पोलीस ठाण्यात द्यावा, असे आवाहन करून डॉ. नाईक पुढे म्हणाले, कळगुटकर यांना ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री, कारवारचे खासदार, जिल्हा प्रशासन, पोलीस खात्याने आणि प्रसिद्धी माध्यमानी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारवार अर्बन बँकेचे ठेवीदार अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अलिकडच्या काळात सहकारी सोसायट्या, बँकाकडून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याकरिता सरकारी खात्याने सरकारी बँकांना किंवा सोसायट्यांना परवानगी देताना कडक नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. नाईक यांनी केले. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य साईनाथ मेत्री, विनायक चिपकर, संतोष कदम, प्रकाश शेट्टी, चंद्रकला वेर्णेकर, शैला कळगुटकर, अभीया शेख, खलील खादी, दोड्डण्णावर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.