For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमसीसी संघ विजयी

11:07 AM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
एमसीसी संघ विजयी
Advertisement

पावसामुळे के. आर. शेट्टी-अर्णव संघाला प्रत्येकी एक गुण 

Advertisement

बेळगाव : सिगन स्पोर्ट्स क्लब आयोजित सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत एमसीसी संघाने प्लेअर चॉईस क्रिकेट संघाचा 22 धावांनी पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले तर पावसामुळे के. आर. शेट्टी-अर्णव संघाला प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. पहिल्या सामन्यात एमसीसी संघाने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात सर्वगडी बाद 100 धावा केल्या. दादापीर हाजीने 4 चौकारासह 26, अमोघने 14 तर तारीक अहमद गौसपीर हाजी यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. क्रिकेट प्लेअर चॉईसतर्फे साहील हळदणकरने 20-4, नईमने  28-2, तर अक्रम पिरजादेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्लेअर चॉईस संघाचा डाव 12.5 षटकात 78 धावांत आटोपला.

वसीम होनगेकरने 1 षटकार 4 चौकारासह 32 तर अक्रम पिरजादेनेने 19 धावा केल्या. एमसीसीतर्फे दादापीर हजीने 21-3 तर गौसपीर हाजी, तारीक अहमद, सिद्धार्थ व आकाश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात के. आर. शेट्टीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 124 धावा केल्या. शिवाजी पाटीलने 2 षटकार 3 चौकारासह 40, गुरुप्रसाद पोतदारने 3 चौकारासह 17, जावेद मदनूरने 13, मिलिंद बेळगावकरने 14 तर स्वयंम खोत व सुनील सक्री यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. अर्णव क्रिकेट क्लबतर्फे अक्षितने 23 धावांत 3, देवने 22 धावांत 2 तर भरत हुंदरे, विशाल यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्णव स्पोर्ट्स संघाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.