राज्य डायव्हिंग स्पर्धेत मयुरेश, युवराजला सुवर्ण
बेळगाव : बेंगळूर येथील हलसूर जलतरण तलावात कर्नाटक राज्य संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय डायव्हिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या आबा-हिंद स्पोर्ट्स क्लबच्या डायव्हिंगपटुंनी उत्कृष्ट कामगिरी करताना 8 पदके मिळविली. मुलांच्या गट एकमध्ये मयुरेश जाधवने 1 व 3 मी. डायव्हिंग प्रकारात 2 सुवर्ण, युवराज मोहनगेकरने गट 3 मध्ये 1 व 3 मी. स्प्रिंग बोर्ड ड्रायव्हिंग मध्ये 2 सुवर्ण, नील मोहितेने ग्रुप 2 मध्ये 1 व 3 मी. स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये 2 कास्य, तन्वी कारेकरने 1 व 3 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये 2 रौप्य, वरुण जोगमन्नावर, प्राची कदम, तन्वी मुचंडी, श्रेया जोगमन्नावर, यांनी प्रदर्शनीय डायव्हिंगमध्ये भाग घेऊन प्रशस्तीपत्र व पदके संपादन केली. डायव्हिंगपटूंना जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, शिवराज मोहिते, संदीप मोहिते, यांचे मार्गदर्शन लाभते तर क्लबचे पदाधिकारी अॅड. मोहन सप्रे, शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.