महापौर, उपमहापौरांची माळमारुती, कणबर्गीला भेट
12:35 PM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : महापौर मंगेश पवार व उपमहापौर वाणी जोशी यांनी बुधवारी (दि. 26) सकाळी माळमारुती व कणबर्गीला भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागात अनेक ठिकाणी अस्वच्छता असून परिसर स्वच्छ ठेवून आरोग्यदायी वातावरण राहावे याकडे लक्ष देण्याची सूचना आरोग्य निरीक्षकांना केल्या. यावेळी महापौर, उपमहापौर यांच्यासमवेत सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाळी व आरोग्य स्थायी समिती अध्यक्षा लक्ष्मी राठोड उपस्थित होत्या.
Advertisement
Advertisement