महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महापौर-उपमहापौरांनी केली मंगाई मंदिर परिसरात पाहणी

11:52 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यात्रोत्सवात सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : वडगाव येथील श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांनी परिसराला भेट देऊन तेथील समस्या दूर करण्याबाबत सूचना केली आहे. या यात्रोत्सवाला भाविक मोठ्या संख्येने येत असतात. दर्शनासाठी लांब रांगा लागलेल्या असतात. मात्र, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा लावणे याचबरोबर बॅरिकेड्स उभे करून स्थितबद्धरीत्या दर्शनाची सोय करावी, असे महापौरांनी सांगितले.

Advertisement

श्री मंगाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात दरवर्षी पार पडत असते. भर पावसामध्येच यात्रा भरत असल्याने महिला, लहान मुले, वृद्धांना त्रास होतो. तेव्हा जास्तीत जास्त भाविकांना लवकरात लवकर दर्शन देण्याची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली. या परिसरात गेल्या दोन दिवसांपासूनच महापालिकेने स्वच्छता व इतर सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. जनतेने व भाविकांनी याबाबत दक्षता घ्यावी. सध्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे त्यांनी जनतेला आवाहन केले.

पथदीप तसेच वीजपुरवठा योग्य प्रकारे तसेच सुरळीत ठेवावा, सध्या पावसामुळे बऱ्याच वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. तेव्हा देवस्थान कमिटीने या परिसरात जनरेटरची सोय करावी, असे त्यांनी सांगितले. येथील पाहणी केल्यानंतर त्यांनी बळ्ळारी नाल्याला भेट दिली. नाल्यामध्ये असलेल्या जलपर्णी व गाळ काढणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पुढील वर्षी या नाल्याच्या खोदाईबाबत आतापासूनच नियोजन करावे, असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर आनंद चव्हाण, सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article