महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मॅक्सवेलची पुन्हा एकदा तुफानी खेळी

06:29 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

55 चेंडूत 120 धावांचा पाऊस : दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ अॅडलेड

Advertisement

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचे वादळ पुन्हा एकदा पाहायला मिळाले. अष्टपैलू मॅक्सवेलने अवघ्या 55 चेंडूत 120 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 8 षटकारांची  बरसात केली. ग्लेन मॅक्सवेलचे आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यातील हे पाचवे शतक आहे. दरम्यान, मॅक्सवेलच्या या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 4 बाद 241 धावा केल्या. या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 9 बाद 207 धावापर्यंत मजल मारता आली. कांगारुंनी हा सामना 34 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 13 रोजी पर्थमध्ये होईल.

अॅडलेडमध्ये झालेल्या या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा हा निर्णय घेतला. कांगारुंच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जोस इंग्लिश 4 धावा काढून बाद झाला. कर्णधार मिचेल स्टार्क (29) व स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर (22) हे दोघे देखील स्वस्तात परतले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलने मात्र पुन्हा एकदा धमाकेदार खेळी करताना विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. मॅक्सवेलने 55 चेंडूत नाबाद 120 धावा फटकावल्या. टीम डेव्हिडने नाबाद 31 धावा करत त्याला चांगली साथ दिली. मॅक्सवेलच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 5 बाद 241 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाची ही घरच्या मैदानावरील सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 242 धावांचा पाठलाग करताना विंडीजकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक 63 धावा केल्या. याशिवाय, आंद्रे रसेलने 37, जेसॉन होल्डरने नाबाद 28 तर जॉन्सन चार्ल्सने 24 धावा केल्या. इतर विंडीज खेळाडूंनी निराशा केल्यामुळे त्यांना 20 षटकांत 9 बाद 207 धावा करता आल्या. विंडीजला या सामन्यात 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय, सलग दोन पराभवामुळे ही मालिकाही त्यांना गमवावी लागली.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 4 बाद 241 (मॅक्सवेल नाबाद 120, टीम डेव्हिड नाबाद 31, मिचेल मार्श 29, होल्डर 2 तर शेफर्ड, जोसेफ प्रत्येकी एक बळी).

विंडीज 20 षटकांत 9 बाद 207 (रोव्हमन पॉवेल 63, होल्डर नाबाद 28, स्टोनिस 3 तर हॅजलवूड व जॉन्सन 2 बळी).

शतकी खेळीसह मॅक्सवेलचा अनोखा विक्रम

विंडीजविरुद्ध मॅक्सवेलने 200च्या स्ट्राईक रेटने धावा करत शतक पूर्ण केले. अवघ्या 50 चेंडूत रविवारी त्याने कारकिर्दीत पाचवे टी20 आंतरराष्ट्रीय शतक साकारले. या शतकासोबतच त्याने रोहित शर्माच्या टी 20 आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी केली. आता दोघांच्या नावावर प्रत्येकी 5 5 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. याशिवाय, मॅक्सवेलने सर्वात कमी डावात पाच टी 20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याचाही विक्रम केला आहे. मॅक्सवेलने आपल्या 94 व्या डावात पाचवे टी 20 शतक पूर्ण केले तर रोहितने 143 डावात ही कामगिरी केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article