मॅक्सवेलची आयपीएल मिनी लिलावातून माघार
वृत्तसंस्था/ सिडनी
गेल्या दशकभरात आयपीएल कारकीर्द निराशाजनक राहिलेल्या ग्लेन मॅक्सवेलने 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या आगामी मिनी लिलावातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तऊणपणी एक अभूतपूर्व प्रतिभा असल्याने ‘बिग शो’ म्हणून ओळखला गेलेला 37 वर्षीय ग्लेन मॅक्सवेल 2012 पासून 2019 मधील एक हंगाम वगळता प्रत्येक आयपीएल हंगामात खेळला आहे, त्याने 141 सामन्यांमध्ये 155 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने आणि 24 पेक्षा कमी सरासरीने केवळ 2819 धावा केल्या आहेत, जे गेल्या काही वर्षांपासून लिलावांमध्ये त्याला सातत्याने मिळत असलेल्या किमतीला अनुरूप नाही. त्याने 41 बळी देखील घेतले आहेत. मॅक्सवेलने कोणतेही कारण स्पष्ट केले नसले, तरी बहुतेक संघ त्याच्याकडून चांगली कामगिरी घडण्याची वाट पाहून पाहून कंटाळले आहेत. मॅक्सवेलच्या कामगिरीचे विश्लेषण केले असता असे दिसून येते की, त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त पैसे दिले जात होते.